Vivo X80 Series : वनप्लस 10 प्रो, शाओमी 12 प्रो नंतर आता विवोचा नवा स्मार्टफोन… जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
विवो एक्स 80 ही सिरीज चिनी स्मार्टफोन तयार करणार्या लेटेस्ट फ्लॅगशिप फोनची नवी निर्मिती आहे. यात तीन मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. यात, बेस मॉडेल एक्स 80 सोबतच एक्स 80 प्रो आणि एक्स 80 प्रो प्लसचा समावेश आहे.
विवो (Vivo) पुढील काही दिवसांमध्ये आपली नवीन एक्स 80 सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नवीन स्मार्टफोन लाँच होण्याआधी या सिरीजची पहिली झलक ग्राहकांना आकर्षित (Attractive) करणारी ठरली आहे. सोबत या नवीन फोनच्या (smartphone) स्पेसिफिकेशन्स बाबतही माहिती लिक झाली असल्याने अधिकच उत्सूकता ताणली गेली आहे. विवोच्या एक्स 80 सिरीजमध्ये तीन नवीन मॉडेल असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 91 मोबाईल्सच्या एका रिपोर्टनुसार, इशान अग्रवाह यांनी चिनमध्ये हा फोन लाँच होण्याच्या आधी एक्स 80 प्रोच्या पूर्ण स्पेसिफिकेशन्सची (Specifications) लिस्ट शेअर केली आहे. या फोनच्या लाँचिंगची अधिकृत तारीख अद्याप जाहिर झालेली नसली तरी, एका माहितीवरुन ही नवी सिरीज 25 एप्रिल रोजी विवोच्या एका लाँचिंग इव्हेंटमध्ये बाजारात आणली जाणार असल्याचे चर्चा आहे.
काय आहेत स्पेसिफिकेशन्स
या सिरीजमध्ये 6.78 इंचाची AMOLED डिसप्ले असेल, ज्यात 2K रीझॉल्युशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सँपलिंग रेट असेल. या पॅनलमध्ये इन डिसप्ले फिंगरप्रिंट रीडरदेखील असेल. प्रीमिअम ग्रेड हँडसेट क्वालकोम स्नॅपड्रेगन 8 जेन 1SoC ला पॅक करेल. 12GB LPDDR5 रेम आणि 256GB किंवा 512GB इंटरनल स्टोरेजसोबत उपलब्ध असणार आहे. एका रिपोर्टनुसार, वॅनिला विवा एक्स 80 मीडियाटेक डायमेंशन 8100 चिपसेटसोबत उपलब्ध होउ शकतो. तसेच विवो एक्स 80 प्रो मीडियाटेक डाइमेंशन 9000 एसओसी सोबत मिळू शकतो, दुसरीकडे विवो एक्स 80 प्रो प्लसच्या क्वालकोम स्नॅपड्रेगन 8 जेन 1 चिपसेटसोबत लाँच होण्याची शक्यता आहे.
कॅमेरा कसा असेल?
या सिरीजच्या कॅमेरा फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिअरमध्ये एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट टेलीफोटो शूटर आणि 8 मेगापिक्सलचा पॅरिस्कोप लेंस आहे, जी 5× ऑप्टीकल आणि 60× डिजिटल झूमही ऑफर करता येते. डिव्हाइस एका मोठ्या 4,700mAh बॅटरी पॅकने सुसज्ज असेल जी 80w फास्ट चार्जिंग आणि 50w वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. सॉफ्टवेअरसाठी हा Android 12ओएस आधारीत OriginOS Ocean वर काम करु शकतो.
इतर बातम्या :