मुंबई : व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी Redx Family नावाचे दोन नवीन पोस्टपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना सुरू केल्या आहेत, ज्याची किंमत 1,699 रुपये आणि 2,299 रुपये इतकी आहे. या योजना अनुक्रमे 3 आणि 5 सदस्यांद्वारे वापरल्या जाऊ शकतात. प्रायमरी युजर्स या प्लॅन्समध्ये अनुक्रमे दोन किंवा चार सदस्य जोडू शकतात. (Vodafone Idea RedX Family plan launched with price of Rs 1699 and 2299, 5 members will get everything for free)
1,699 च्या व्होडाफोन-आयडिया रेडएक्स फॅमिली प्लॅनबद्दल (Vodafone-Idea RedX Family) बोलायचे झाल्यास, हा प्लॅन घेणारा ग्राहक त्यात आणखी दोन लोकांना जोडू शकतो, याचा अर्थ या प्लॅनमध्ये एकूण 3 सदस्य सपोर्ट करतात. या प्लॅननुसार, प्रायमरी आणि सेकेंडरी दोन्ही सदस्यांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि राष्ट्रीय रोमिंग कॉल्सची सुविधा मिळेल. यासह, सर्व सदस्यांना दर महिन्याला अनलिमिटेड डेटा आणि 3000 एसएमएस मिळतील.
व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये, प्रायमरी सदस्यांसाठी एक वर्षासाठी Amazon प्राइम मेंबरशिप, एक वर्षासाठी नेटफ्लिक्स आणि एक वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीची फ्री मेंबरशिप मिळणार आहे. यासह, त्याला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंजचा अॅक्सेस मिळेल. तसेच यूएसए आणि कॅनडासाठी ISD कॉल 50 पैसे प्रति मिनिट आणि यूकेसाठी 3 रुपये प्रति मिनिट आकारले जातील.
या प्लॅनमध्ये 5 युजर्स सपोर्टेड आहेत. याचा अर्थ असा की प्रायमरी सदस्यासह 4 सेकेंडरी युजर्स यात जोडू शकतो. या व्यतिरिक्त यात कोणतेही बदल केले गेले नाहीत. यामध्ये सर्व सदस्यांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा बेनिफिट्स आणि एसएमएस सुविधा मिळतील. यासह, या प्लॅनमध्ये तुम्हाला OTT अॅप्सचं सब्सक्रिप्शन आणि ISD कॉलिंग रेट्सची समान सुविधा असेल.
इतर बातम्या
5G नेटवर्कची सर्वत्र चर्चा, पण इंटरनेट स्पीड किती असणार?
अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा पाहिजे? Vi चे 150 रुपयांहून कमी किंमतीचे प्लॅन्स पाहा
(Vodafone Idea RedX Family plan launched with price of Rs 1699 and 2299, 5 members will get everything for free)