Instragram Reels व्हायरल होत नाहीत! मग या टीप्स फॉलो करा आणि प्रसिद्धी मिळवा
इन्स्टाग्राम हे तरुणांमध्ये सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून रिल्स बनवून पैसे कमवण्यची नामी संधी असते. पण अनेकदा रिल्स बनवूही प्रसिद्धी मिळत नाही.
मुंबई : इन्स्टाग्राम हे सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. खासकरुन तरुणांमध्ये इन्स्टाग्रामची सर्वाधिक क्रेझ पाहायला मिळते. या प्लॅटफॉर्मवर युजर्स आपल्या टॅलेंटचा पुरेपर वापर करत आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण इन्स्टाग्रामवर पोस्ट केले जातात. त्याचबरोबर आपल्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी तासंतास रिल्सवर खर्च केले जातात. मात्र इतकं करुनही पदरी तसं काही पडत नाही. त्यामुळे जर तुम्हाला इन्स्टाग्रामवर झटपट प्रसिद्धी मिळवायची असेल तर या टिप्स मदतीने फायदा होईल. तुमची रिल्स यामुळे लगेचच व्हायरल होईल. तुम्हीही इतर पॉप्युलर युजर्ससारखे प्रसिद्ध होऊन जाल. जर तुमचं इन्स्टाग्राम रिल्स मॉनिटाइज्ड झाला तर लाखो रुपयांची कमाई देखील करू शकता.
अनेक युजर्स इन्स्टाग्रामवर रिल्स तयार करतात पण त्यांना यश मिळत नाही. रिल्स व्हायरल होत नसल्याने त्याचे व्ह्यूजही नसल्यासारखेच असतात. चला जाणून सोप्या टीप्स यामुळे तुमचे रिल्स झटपट व्हायरल होतील आणि तुम्हाला प्रसिद्धीही मिळेल.
टेक्स अॅड करा – रिल्सच्या फीचर इमेजमध्ये शॉर्ट टेक्स्ट लिहिल्याने फायदा होतो. त्यामुले युजर्सचं एंगेजमेंट वाढतं. तुम्ही रिल्सवर कलर्ड किंवा क्रिएटिव्ह कॅप्शन लिहू शकता. रिल्सच्या रिलेटेड डिटेल्स डिस्क्रिप्श देखील लिहा. तसेच टॅगिंग आणि हॅशटॅग टाकण्यास विसरु नका.
स्टिकर्स – इन्स्टाग्रामवर रिल्स कॅप्शन अॅड केल्यानंतर GIFs आणि स्टिकरचा वापरही करा. त्याचबरोबर लोकेशन सुद्धा अॅड करा. त्यामुळे युजर्संना रिल्सचं लोकेशन सहज समजतं.
AR इफेक्ट – जर तुम्हाला रिल्स बनवण्यात परफेक्ट असाल तर इन्स्टाग्राम रिल्स गॅलरीतून AR इफेक्ट यूज करा.
फिल्टर्स – इन्स्टाग्राम रील्समध्ये वेगवेगळे फिल्टर वापरल्याने तुमचा व्हिडीओ चांगला दिसेल आणि त्याद्वारे प्रसिद्धी मिळवू शकता.इफेक्टसाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. इन्स्टाग्राम रील्सवर डावीकडे स्वाइप केल्यानंतर तिथे फिल्टर उपलब्ध आहेत आणि ते तुम्ही विनामूल्य वापरू शकता.
ट्रेंडिंग ऑडियो – इन्स्टाग्रामवर अनेक ट्रेंडिंग गाणी आणि ऑडिओ क्लिप व्हायरल होतात.त्यामुळे तुम्ही व्हायरल ऑडिओ किंवा गाण्याच्या क्लिपचा वापर करून रील बनवू शकता. तुमचा व्हिडिओ अधिक चांगला बनवण्यासाठी तुम्ही व्हॉइस ओव्हर वापरू शकता.
फ्रेम सेटअप – इन्स्टाग्रामवर रील शूट करताना, तुम्ही नेहमी फुल फ्रेम घ्यावी. अशी रिल बघायला छान दिसते.