जगातील पहिला ट्रान्सपरंट टीव्ही, LG ने केली कमाल, पाहा थेट आरपार

LG Transparent TV | एलजी कंपनीने टीव्हीमध्ये क्रांती आणली आहे. कंपनीने जगातील पहिला पारदर्शक टीव्ही आणला आहे. लास वेगासमध्ये कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सुरु आहेत. त्यात या टीव्हीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एलजीने जगातील पहिला वायरलेस ट्रान्सपरंट टीव्ही लाँच केला आहे. कसा आहे हा टीव्ही, काय आहेत त्याचे फीचर्स...

जगातील पहिला ट्रान्सपरंट टीव्ही, LG ने केली कमाल, पाहा थेट आरपार
Follow us
| Updated on: Jan 10, 2024 | 3:09 PM

नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : LG कंपनीने टीव्हीमध्ये नवीन क्रांती आणली आहे. कंपनीने जगातील पहिला ट्रान्सपरंट टीव्ही बाजारात आणला आहे. लास वेगासमध्ये CES 2024 म्हणजे कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शो सुरु आहेत. त्यात कमालचे गॅझेट सादर होत आहेत. यामध्ये एलजी कंपनीने पण त्यांचा एक खास टीव्ही सादर केला आहे. कंपनी दरवर्षी या शोमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत टीव्ही आणते. पण यावेळी कंपनीने एक खास टीव्ही बाजारात आणला आहे. त्याची जगभर चर्चा सुरु आहे. हा नेहमीचा टीव्ही नाही तर पारदर्शक टीव्ही आहे. LG Signature OLED TV लाँच करण्यात आला आहे. अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

काय आहे या टीव्हीत खास

  • सॅमसंगने ट्रान्सपरंट डिस्प्ले दाखवला होता. एलजीने कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक शोमध्ये एम आणि जी सीरीज अपडेट केली आहे. कंपनीने पहिला वायरलेस पारदर्शक OLED TV आणला आहे. हा टीव्ही रिझोल्यूशन्स आणि एलजीच्या वायरलेस ऑडियो-व्हिडिओ तंत्रज्ञानावर चालतो.
  • या टीव्हीत कॉन्स्ट्रास्ट स्क्रीन देण्यात आली आहे. ही OLED TV कंपनीच्या लेटेस्ट Alpha 11 AI प्रोसेसरसह येते. गेल्या जनरेशनच्या तुलनेत हा टीव्ही 4 पट दमदार कामगिरी बजावत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
  • कंपनीच्या दाव्यानुसार, या टीव्हीत ग्राफिक्सची कमाल कामगिरी दिसते. तस प्रोसेडिंग स्पीड 30 टक्के चांगला आहे. हा टीव्ही झिरो कनेक्ट बॉक्ससह येतो. गेल्यावर्षी M3 OLED सह तो बाजारात आला होता. हा बॉक्स व्हिडिओ आणि ऑडिओ वायरलेस पद्धतीने टीव्हीला पाठवतो.

केव्हा खरेदी करता येईल हा टीव्ही

हे सुद्धा वाचा

ग्राहक त्यांचे सर्व स्ट्रीमिंग डिव्हाईसेस आणि गेम कन्सोल या बॉक्ससोबत कनेक्ट करुन टीव्हीवर पाहू शकतात. Oled TV मॉडलमध्ये स्पीकर खालील बाजू देण्यात आले आहेत. तसेच या टीव्हीला बॅकलाईट्स पण देण्यात आले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार हा टीव्ही अनेक पर्यायात उपलब्ध होईल. हा टीव्ही एखाद्या फीश टँक सारखा दिसतो.

सॅमसंगचा पारदर्शक डिस्प्ले

समॅसंगने या शोमध्ये त्यांचा पारदर्शक डिस्प्ले दाखवला आहे. पण तो Micro LED व्हर्जन आहे. समॅसंग हा टीव्ही लाँच करेल की नाही, हे अजून समॅसंगने स्पष्ट केलेले नाही. एलजीने पण त्यांच्या टीव्हीची किंमत किती असेल याची माहिती दिलेली नाही. पण कंपनी याच वर्षात 2024 मध्ये हा टीव्ही विक्रीची योजना आखत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.