WAVES समिट 2025; TruthTell Hackathon च्या 5 विजेत्यांची घोषणा, फॅक्ट चेकमधील अनेक जण दिग्गज खेळाडू
Waves Summit 2025 : ट्रुथटेल हॅकाथॉनच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आला आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहयोगाने ही नावे जाहीर केली आहेत. या विजेत्यांनी एआयच्या मदतीने अशा प्रकारचे उत्कृष्ट उपाय विकसित केले आहेत.

तंत्रज्ञानाद्वारे मीडिया क्षेत्रातील चुकीच्या माहितीशी लढा देणे – ही एक जागतिक आव्हान, या विषयावर अनेकांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने छाप सोडली. सोमवारी ट्रुथटेल हॅकाथॉनच्या 5 विजेत्यांची घोषणा करण्यात आला आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहयोगाने ही नावे जाहीर केली आहेत. या विजेत्यांनी एआयच्या मदतीने अशा प्रकारचे उत्कृष्ट उपाय विकसित केले आहेत. ‘क्रिएट इन इंडिया चॅलेंज’ अंतर्गत ही हॅकाथॉन आयोजित करण्यात आली होती. ही हॅकाथॉन जी आगामी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (World Audio Visual & Entertainment Summit – WAVES 2025) चा एक भाग आहे.
घसघशीत बक्षीसं
या हॅकाथॉनसाठी जगभरातून 5,600 हून अधिक तज्ज्ञांनी नोंदणी केली होती. त्यातून खालील 5 संघाना 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. या सर्व विजेत्यांना नवी दिल्लीतील प्रतिष्ठित इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित एका खास कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात निवडलेल्या टॉप 25 इनोव्हेटर्सनी त्यांच्या कार्यरत प्रोटोटाइप्सचे इंडस्ट्री तज्ज्ञांच्या पॅनेलसमोर सादरीकरण केले.




हे आहेत टॉप 5 विजेते
टीम युनिक्रॉन, दिल्ली (Team Unicron) – या संघाला त्यांच्या ‘अन्वेषा’ नावाच्या प्रोजेक्टसाठी सन्मानित करण्यात आले. टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओतील चुकीची माहिती ओळखण्यात अन्वेषा एक उत्कृष्ट मॉडेल ठरले आहे.
अल्केमिस्ट, डेहराडून(Team Alchemist) – या संघाने ‘व्हेरीस्ट्रीम’ प्रोजेक्ट “फॅक्ट फर्स्ट इन एव्हरी फ्रेम” हा प्रोजेक्ट सादर केला होता. LangChain-संचालित NLP, डायनॅमिक नॉलेज ग्राफ, GIS इनसाइट्स आणि एक्सप्लेनेबल AI यांचा वापर करून लाईव्ह ब्रॉडकास्टमध्ये चुकीची माहिती शोधून ती सुधारण्यासाठी या तंत्राचा वापर होतो.
हूशिंग लायर्स, बेंगळुरू (Team Whooshing Liars) – या संघाने ‘नेक्सस ऑफ ट्रुथ’ या प्रकल्पावर जोरदार काम केले. AI-संचालित टूलच्या मदतीने ही व्यवस्था डीपफेक, न्यूज आर्टिकल्सची फॅक्ट चेकिंग आणि रिअल-टाईममध्ये चुकीची माहिती चिन्हांकित करते. यात बहुभाषिक समर्थन आणि लाइव-स्ट्रीमिंग अलर्ट्सच्या सुविधेमुळे अडचणी आणि चुकीची माहिती बदलता येते.
बग स्मॅशर्स, दिल्ली (Team Bug Smashers) – या टीमच्या ‘लाइव ट्रुथ’ प्रोजेक्टने विजेत्यांच्या यादीत त्यांनी नाव कोरले. लोकल LLM फॅक्ट चेकिंग API चा वापर करून फॅक्ट चेक करते. रिअल टाइममध्ये एक AI-संचालित चुकीची माहिती डिटेक्ट करते. GPS-आधारित SMS व्हेरिफिकेशनद्वारे कम्युनिटी-संचालित सत्यापन करते.
व्होर्टेक्स स्क्वाड, बेंगळुरू (Team Vortex Squad) – या संघाला रिअल-टाईम चुकीची माहिती डिटेक्शन आणि फॅक्ट चेकिंग सिस्टीमसाठी गौरवण्यात आले. हे AI-संचालित टूल लाईव्ह इव्हेंटदरम्यान चुकीची माहिती असेल तर ती ओळखते, तिला हायलाईट करते आणि रिअल-टाईममध्ये अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करते.
ही सर्व मॉडेल्स मुंबईत पाहता येणार
मीडिया क्षेत्रातील पारदर्शकता आणि विश्वासार्हता जपण्यासाठी तसेच चुकीच्या माहितीविरोधात लढण्यासाठी या संघानी जबरदस्त ताकदीची ही टुल्स विकसित केली आहेत. पुढील महिन्यात, 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या WAVES समिटमध्ये ती प्रदर्शित होतील. ह्या हॅकाथॉनचा उद्देश मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जबाबदारीने नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आहे.
डिजिटल युगात खोटी माहिती प्रसाराला आळा घालणे हे आव्हान – मोहिंद्रू
इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि IndiaAI मिशनचे CEO अभिषेक सिंग, आयटी मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजीव शंकर, मायक्रोसॉफ्ट इंडियाचे डायरेक्टर (AI टेक स्ट्रॅटेजिस्ट) विक्रम मल्होत्रा, ABG Venture Partners चे मॅनेजिंग पार्टनर आलोक गुर्टू, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) चे सीनिअर रिसर्चर डॉ. अविक सरकार आणि Stage चे सह-संस्थापक व CTO शशांक वैष्णव सहभागी झाले होते. आजच्या काळात चुकीची माहिती टिकत नाही. डिजिटल युगात खोटी माहिती प्रसाराला आळा घालणे हे मोठे आव्हान असल्याचे मत ICEA चे चेअरमन पंकज मोहिंद्रू यांनी नोंदवले.