युझर्सच्या मृत्यूनंतर फेसबुक अकाऊंटचं काय होतं?

मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबुक यूजर्सची संख्या सर्वाधिक आहे. दररोज फेसबुकच्या माध्यमातून लाखो लोक एकमेकांशी बोलत असतात. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटचं काय होतं? हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. legacy कॉन्टॅक्ट : तुमच्या फेसबुक अकाऊंटवर फेसबुकची देखरेख ठेवायची असेल, तर ‘legacy contact’ हा पर्याय निवडणे गरजेचे […]

युझर्सच्या मृत्यूनंतर फेसबुक अकाऊंटचं काय होतं?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : सोशल मीडियामध्ये फेसबुक यूजर्सची संख्या सर्वाधिक आहे. दररोज फेसबुकच्या माध्यमातून लाखो लोक एकमेकांशी बोलत असतात. मात्र, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटचं काय होतं? हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

legacy कॉन्टॅक्ट :

तुमच्या फेसबुक अकाऊंटवर फेसबुकची देखरेख ठेवायची असेल, तर ‘legacy contact’ हा पर्याय निवडणे गरजेचे आहे. हा पर्याय निवडल्यावर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर फेसबुक त्याचं अकाऊंट मॅनेज करू शकते. त्यानंतर त्या व्यक्तीचे फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला जातो. तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणाऱ्यांना मृत झाल्याची माहिती दिली जाते.

फेसबुक मृत युझर्सच्या अकाऊंटसोबत काय करते?

एखादी व्यक्ती मरण पावल्यावर फेसबुक त्यांचे अकाऊंट ‘मेमोरियलाईज’ करते. अर्थात फेसबुक हे अकाऊंट डिलीट करत नाही. याउलट त्या व्यक्तीचे फोटो आणि पोस्ट आठवणी म्हणून जपून ठेवते.

‘मेमोरियलाईज’ अकाऊंटमध्ये त्या व्यक्तीच्या नावापुढे ‘रिमेंबरिंग’ असं जोडलं जातं. जर त्या व्यक्तीने टाईमलाईनवर टॅग करण्याची शेटिंग सुरु ठेवली असेल, तर त्याच्या टाईमलाईनला पोस्ट शेअर करता येते. विशेष म्हणजे, जन्मदिनानिमित्त त्याच्या मित्रांना नोटीफीकेशनदेखील जाते.

फेसबुकला मृत्यू पावल्याची बातमी कशी द्याल?

जेव्हा तुम्ही legacy कॉन्टॅक्टमध्ये जाल तेव्हा फेसबुक तुम्हाला विचारते की, आपण मृत व्यक्तीची माहिती देऊ इच्छिता का? त्यावर क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचा माहिती भरावी लागते. पण महत्त्वाचे म्हणजे, त्या व्यक्तीचे डेथ सर्टिफिकेट अपलोड करावे लागते. त्यानंतरच ते अकाऊंट डिलीट होतं.

फेसबुक पॅलिसी :

व्यक्तीच्या मृत्यूनंतर फेसबुक पॅलिसीनुसार त्या व्यक्तीची माहिती कोणालाही दिली जात नाही. फेसबुक पॅलिसीनुसार हे शेअर करणे गुन्हा आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.