ट्वीटरचे युजर्स Bluesky अ‍ॅपकडे का वळताय? जाणून घ्या कारण

अमेरिकेच्या निवडणुकीनंतर वारे बदलले आहेत. X प्लॅटफॉर्मचे मालक Elon Musk यांच्या निवडणूक प्रचारामुळे लोक X प्लॅटफॉर्मवरून ब्लूस्कायकडे वळत आहेत. Bluesky नेमके काय आहे, युजर्सचे ब्लूस्काय वळण्याचे नेमके कारण काय, जाणून घ्या.

ट्वीटरचे युजर्स Bluesky अ‍ॅपकडे का वळताय? जाणून घ्या कारण
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 12:29 PM

X प्लॅटफॉर्मचे मालक Elon Musk यांनी अमेरिकेच्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. तसेच हेलन मस्क यांनी हेट स्पीचमुळे बॅन एक्स अकाऊंट अनब्लॉक केल्याचा ही आरोप करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या संख्येने युजर्स Bluesky अ‍ॅपकडे वळत आहेत.

युजर्स एक्सवरून Bluesky अ‍ॅपकडे शिफ्ट

X प्लॅटफॉर्मचे मालक Elon Musk यांच्या X प्लॅटफॉर्मपासून सोशल मीडिया युजर्स स्वत:ला दूर ठेवत आहेत. युजर्स एक्स प्लॅटफॉर्मवरून जॅक डोर्सी यांच्या Bluesky अ‍ॅपकडे शिफ्ट होत आहेत. अमेरिकेच्या निवडणूक प्रचारापासून सोशल मीडिया युजर्स इलॉन मस्क यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत.

Bluesky अ‍ॅप म्हणजे काय?

Bluesky हे एक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. Bluesky अ‍ॅपची स्थापना जॅक डोर्सी यांनी 2019 मध्ये केली होती. प्लॅटफॉर्म 2024 च्या सुरूवातीपर्यंत केवळ इनवाईट ओनली बेस्ड होतं. यामुळे विकसकांना नवीन वैशिष्ट्यांची चाचणी घेण्याची परवानगी मिळाली. Bluesky चे मुख्य कार्यकारी अधिकारी जे ग्रॅबर आता या प्रकल्पाचे नेतृत्व करीत आहेत. हे पब्लिक बेनिफिट कॉर्पोरेशन चालवतात.

Bluesky मध्ये काय वेगळे?

Bluesky वर युजर्सना छोटा मेसेज पोस्ट करू शकतात. तसेच फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करू शकतात. याशिवाय युजर्स डायरेक्ट मेसेज पाठवू शकतात. त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डिसेंट्रलाइजेशन फ्रेमवर्क हे आहे. हे डेटा स्टोरेजला स्वतंत्र बनवते.

सोशल मीडियावर एक्सपासून वेगळा Bluesky अल्गोरिदम फीड वापरला जातो. Bluesky युजर्सच्या फॉलो केलेल्या अकाऊंटवरील पोस्टपर्यंत व्हिझियेबल कंटेंट मर्यादित करते.

Elon Musk यांचे चॅटजीपीटीशी संबंध

चॅटजीपीटी हे एआय जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. विशेष म्हणजे Elon Musk ज्या चॅटजीपीटीवर नेहमीच नाराज असतात, ती चॅटजीपीटी 2015 मध्ये त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सुरू करण्यात आली होती. पण नंतर त्यात दुरावा निर्माण झाला आणि मस्क यांनी 2018 मध्ये ओपनएआयचा निरोप घेतला.

Elon Musk यांनी आरोप केला की, ओपनएआय आपला गैर-नफा हेतू विसरला आहे आणि पैसे कमविण्याच्या मार्गावर आहे. पुढे मायक्रोसॉफ्टने ओपनएआयमध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे Elon Musk मायक्रोसॉफ्टवरही नाराज आहेत.

संस्कृती नामशेष होण्याचा धोका

एप्रिल 2024 मध्ये, Elon Musk यांनी एका पोस्टला उत्तर देताना म्हटले होते की जर एआयला स्पष्टपणे किंवा उघडपणे अति-शक्तिशाली एआयमध्ये प्रोग्राम केले गेले तर ते सभ्यता नष्ट करू शकते. मस्क पुढे लिहितात की, आता कल्पना करण्याची गरज नाही. हे गुगल जेमिनी आणि ओपनएआय चॅटजीपीटी मध्ये प्रोग्राम केले गेले आहे.

ट्रम्प यांचे एआय धोरण काय असेल?

यावरून Elon Musk यांना गुगल, चॅटजीपीटी, मायक्रोसॉफ्टकडून किती नापसंती आहे, हे स्पष्ट होते. Elon Musk आता एक्सएआय नावाची स्वतःची एआय कंपनी चालवतात. याचे ग्रोक एआय टूल चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनीशी स्पर्धा करते.

आता ट्रम्प आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत कोणत्या प्रकारचे धोरण अवलंबतात हे पाहावे लागेल. Elon Musk यांनी ट्रम्प यांना उघड पाठिंबा दिला आहे, त्यामुळे ट्रम्प यांच्या एआय धोरणावरही मस्क यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडेल का? हे येणारा काळच सांगेल.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.