गुगल ड्राईव्ह आणि वन ड्राईव्ह या दोन्हीत फरक काय?
आपल्यापैकी बहुतांश लोक Google Drive आणि One Drive या दोन्हीमधला फरक माहिती नसेल. (difference between Google Drive and OneDrive)
मुंबई : आपल्यापैकी बहुतांश लोक Google Drive किंवा One Drive चा वापर करतात. परंतु खूप कमी जणांना माहिती आहे की, या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे. ज्यांना Google Drive आणि One Drive यामधला फरक माहिती नाही, ही बातमी त्यांच्यासाठी आहे. (What is difference between Google Drive and OneDrive?)
Google Drive हे गुगल च्या मालकीचे प्रॉडक्ट आहे. तर One Drive हे मायक्रोसॉफ्ट च्या मालकीचे प्रॉडक्ट आहे. दोन्ही मध्ये एक साम्य आहे की यामध्ये तुम्ही कोणतेही ऑनलाईन डॉक्युमेंट्स सेव्ह करू शकता. तसेच दोन्हीमध्ये क्लाऊड स्टोरेज ची सेवा दिलेली असते.
Cloud Storage ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला गुगल ड्राईव्ह मध्ये तुमच्या गूगल अकाऊंटने लॉग इन करावे लागेल. तर वन ड्राईव्हमध्ये ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट अकाऊंटद्वारे लॉग इन करावे लागेल.
Windows OS मुळे One Drive चा वापर
तसेच One Drive हे तुम्हाला लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर मध्ये जास्त प्रमाणात दिसेल. कारण लॅपटॉप/कॉम्पुटर मध्ये Microsoft कंपनीची Windows OS सिस्टिम असल्यामुळे ते One Drive वापरण्याचा सल्ला देत असतात. त्यासोबत Google Drive चा सुद्धा वापर जास्त प्रमाणात होतो. आपण जेव्हा ही आपल्या मोबाईल वर एखादी फाइल किंवा डॉक्युमेंट ओपन करतो तेव्हा आपल्याला गूगल ड्राईव्ह हा ऑप्शन मिळते.
स्टोरेजचा फरक
दोन्हीमध्ये फार फरक नाही. Google Drive मध्ये तुम्हाला 15GB ऑनलाईन स्टोरेज वापरायला मिळते. तर One Drive वर 5GB ऑनलाईन स्टोरेज वापरायला मिळते. जर तुम्हाला हे स्टोरेज वाढवून हवं असेल तर तुम्ही ह्यांचे Business Plan खरेदी करू शकता.
1 जूनपासून Google Photos साठी पैसे मोजावे लागणार
तुम्ही जर तुमचे फोटो आणि व्हिडीओज गुगल फोटोजवर (Google Photos) सेव्ह करुन ठेवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना सहा महिन्यांपूर्वी याबाबत एक मेलदेखील पाठवला होता, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं की, तुम्ही गुगल फोटोज अॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील.
मेलमध्ये पुढे नमूद केलं आहे की, 1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील. कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुगलची गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली अनलिमिटेड स्टोरेज ऑफर 31 मे 2021 पासून अस्तित्वात नसेल.
जे युजर्स गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फाईल्स) स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
इतर बातम्या
मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोनवर बोलणं चूक की बरोबर?
OTT म्हणजे काय? भारतातील OTT चे लोकप्रिय प्रकार आणि प्लॅटफॉर्म कोणते? जाणून घ्या सर्वकाही