Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

फेसबुकचे सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करताना म्हटलं की, त्यांची कंपनी आता मेटाव्हर्स म्हणून ओळखली जाईल. Metaverse हे एक वेगळं जग आहे जे पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे.

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?
Mark Zuckerberg - Facebook - Meta
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 4:40 PM

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या मूळ कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ असे केले आहे. असं असलं तरी फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहणार आहेत. कंपनी केवळ सोशल मीडिया कंपनीपासून “मेटाव्हर्स कंपनी” बनणार आहे आणि “एम्बेडेड इंटरनेट” वर काम करेल, जे वास्तविक आणि आभासी जग एकत्र करेल, असे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकेरबर्ग यांनी जाहीर केले आहे. (What is Metaverse? What revolution is Facebook trying to change the world through Virtual Reality?)

फेसबुकचं नाव बदलल्यानंतर आता युजर्ससाठी अॅपमध्ये काय बदल होतील? असा सवाल अनेकांना पडला आहे. मात्र जर तुम्ही Facebook वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी काहीही बदलणार नाही, असे स्वतः कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितलं आहे. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी आणि व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठीही हेच आहे. ते वापरत असलेल्या वेबसाइट आणि अॅप्स त्यांची जुनी नावे कायम ठेवली जातील. त्यांचा वापरही तसाच असेल.

Metaverse हा सोशल मीडियाचा पुढचा टप्पा

नवीन नावाची घोषणा करताना झुकेरबर्ग म्हणाले, “आज आमच्याकडे सोशल मीडिया कंपनी म्हणून पाहिले जाते, परंतु आमच्या डीएनएमध्ये आम्ही एक अशी कंपनी आहोत जी लोकांना जोडण्यासाठी तंत्रज्ञान तयार करते आणि Metaverse हा सोशल मीडियाचा पुढचा टप्पा आहे. झुकेरबर्ग यांनी मेटाची घोषणा केल्यानंतरही फेसबुक आपल्या वापरकर्त्यांसाठी पूर्वीप्रमाणेच राहील. अॅप वापरण्याच्या पद्धतीत कोणताही बदल होणार नाही. कोणतेही नवीन फीचर्स किंवा लेआउटची घोषणा केलेली नाही. फेसबुकचा वापर आणि मार्गदर्शक तत्त्वे तशीच राहतील.

अनेक कंपन्या Metaverse बनण्याच्या विचारात

फेसबुकचे सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करताना म्हटलं की, त्यांची कंपनी आता मेटाव्हर्स म्हणून ओळखली जाईल. Metaverse हे एक वेगळं जग आहे जे पूर्णपणे इंटरनेटवर अवलंबून आहे. फेसबुक देखील Metaverse मध्ये सतत गुंतवणूक करत आहे. फेसबुक व्यतिरिक्त, इतर अनेक कंपन्या देखील मेटाव्हर्स बनण्याच्या विचारात आहेत.

कंपनीच्या नवीन नावाची घोषणा करताना मार्क झुकरबर्ग म्हणाले, “सामाजिक समस्यांशी लढताना आणि अगदी जवळच्या प्लॅटफॉर्मवर एकत्र असताना आम्ही खूप काही शिकलो आहोत आणि आता आम्ही जे काही शिकलो आहोत त्या अनुभवातून नवीन दृष्टिकोन स्वीकारण्याची वेळ आली आहे. मेटाव्हर्स बनणे आमचे ध्येय आहे. आमचे अॅप्स आणि ब्रँडची नावे बदलणार नाहीत. आज आम्हाला सोशल मीडिया कंपनी म्हणून ओळखले जाते, परंतु आम्ही लोकांना जोडणारे तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी आहोत.

काय बदललं आणि काय बदलणार नाही?

फेसबुकच्या नव्या घोषणेनंतर काय बदलले आणि काय बदलले नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. फक्त कंपनीचे ब्रँडिंग बदलले आहे म्हणजेच फेसबुक कंपनी आता मेटा म्हणून ओळखली जाईल. फेसबुकवर नव्हे तर कंपनीच्या मुख्यालयावर मेटा लिहिले जाईल. फेसबुक अॅपचे नाव बदललं जाणार नाही आणि इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरचे नावही बदललं जाणार नाही. कंपनीच्या विविध पदांमध्ये कोणताही बदल होणार नसून 1 डिसेंबरपासून कंपनीच्या स्टॉकवर MVRS नावाचे स्टिकर असेल. कंपनीच्या मुख्यालयावरील थंब (लाइक) लोगो आता काढून टाकण्यात आला आहे आणि त्याच्या जागी नवीन लोगो देण्यात आला आहे जो इन्फिनिटी सारखा आहे.

मार्क झुकरबर्ग यांनी मेटाव्हर्सला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट (आभासी वातावरण किवा आभासी जग) म्हटलं आहे. झुकरबर्क यांच्या मते, तुम्ही फक्त स्क्रीन बघून वेगळ्या जगात प्रवेश करु शकता जिथे तुम्ही व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट, ऑग्युमेंट रिअॅलिटी गॉगल, स्मार्टफोन अॅप्स इत्यादीद्वारे लोकांशी कनेक्ट होऊ शकता, गेम्स खेळू शकता, खरेदी करू शकता आणि सोशल मीडियाचा वापर करू शकता. Metaverse मध्ये तुम्ही आभासी रुपात अनेक कामं करु शकता, लोकांशी बोलू शकता, भेटू शकता, बैठका आयोजित करु शकता, गेम्स खेळू शकता. मेटाव्हर्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. कॉम्प्युटरऐवजी एखादा हेडसेट वापरून तुम्ही या मेटाव्हर्सचा अनुभव घेऊ शकता. हा हेडसेट तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिजीटल अनुभव असणाऱ्या एका व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे आभासी जगाशी जोडेल. सध्या व्हर्च्युएल रिएलिटी म्हणजेच VR चा वापर हा प्रामुख्याने गेमिंगसाठी केला जातो. पण मेटाव्हर्स मात्र काम, टाईमपास, कॉन्सर्ट्स, सिनेमा किंवा नुसती मजामस्ती करायलाही वापरता येईल.

मेटाव्हर्स काय आहे?

मेटाव्हर्स हा आज अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला असेल, पण तो खूप जुना शब्द आहे. नील स्टीफन्सन यांनी 1992 मध्ये त्यांच्या डायस्टोपियन कादंबरी “स्नो क्रॅश” मध्ये याचा उल्लेख केला होता. स्टीफन्सनच्या कादंबरीमध्ये, मेटाव्हर्सचा अर्थ असा होता की ज्यामध्ये लोक हेडफोन्स आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी यांसारख्या गॅझेट्सच्या मदतीने गेममधील डिजिटल जगाशी जोडलेले असतात. Metaverse आधीच गेमिंगसाठी वापरला जात आहे. मेटाव्हर्समध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, Metaverse हे इंटरनेटचे एक नवीन जग आहे जिथे लोक उपस्थित नसले तरीही ते उपस्थित असतील. अजून वेगळ्या पद्धतीने सांगायचं झालं तर, मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं किंवा निर्माण केलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल (डिजिटल कॉपी असेल) आणि कॉम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल. एकमेकांशी जोडले जाल. या मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही किंवा तशी कुणी लिहिलेली नाही. पण यामध्ये तुमचं प्रतिनिधित्वं करणारा तुमचा एक 3D अवतार असेल, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, एक महत्त्वाची गोष्ट विसरुन चालणार नाही, ती गोष्ट म्हणजे Metaverse पूर्ण होण्यास बराच वेळ लागेल.

1 डिसेंबरपासून नवीन टिकरसह स्टॉक व्यापार करेल

कंपनीने सांगितले की, त्यांचा शेअर 1 डिसेंबरपासून एमव्हीआरएस या नवीन टिकरखाली ट्रेडिंग सुरू करेल. झुकरबर्गने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही अपेक्षा करतो की Metaverse पुढील दशकात 1 अब्ज लोकांपर्यंत पोहोचेल, डिजिटल कॉमर्समध्ये शेकडो अब्ज डॉलर्सच्या डिजिटल कॉमर्सचे आयोजन करेल आणि लाखो निर्माते तसेच विकासकांसाठी नोकऱ्यांना सपोर्ट करेल.”

सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल

दरम्यान, मेटाव्हर्सची घोषणा करताना झुकरबर्गने फेसबुकचे भविष्य काय असेल याची मांडणी केली आहे. या सेवा प्रदान करताना लोकांच्या सुरक्षिततेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी प्राधान्याने घेतली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

2005 ला ही कंपनीने नाव बदललं होतं

फेसबुकचे माजी सिविक इंटिग्रिटी चीफ समिध चक्रवर्ती यांनी कंपनीला ‘मेटा’ हे नाव सुचवले होते. यापूर्वी फेसबुकने 2005 मध्ये असेच काही केले होते, जेव्हा त्याने आपले नाव TheFacebook वरून Facebook असे बदलले होते. जगभरात 3 अब्जाहून अधिक लोक फेसबुक वापरतात. त्याचवेळी, भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या 41 कोटी आहे. फेसबुक आणि इतर मोठ्या कंपन्यांसाठी ‘मेटाव्हर्स’ ही संकल्पना उत्साहवर्धक आहे कारण ती नवीन बाजारपेठा, नवीन प्रकारचे सोशल नेटवर्क्स, नवीन ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन पेटंटसाठी संधी निर्माण करेल, अशा मार्केटमध्ये आशा आहेत.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

(What is Metaverse? What revolution is Facebook trying to change the world through Virtual Reality?)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.