जाणून घ्या, लॅपटॉप स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग कोणता? कधीच होणार नाही नुकसान

आजकाल मोठ्या प्रमाणावर लॅपटॉपवर काम केले जाते. त्यामुळे लॅपटॉप हे सर्वांसाठीच जवळजवळ आवश्यक असणारे गॅझेट बनले आहे. कार्यालयापासून घरापर्यंत याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

जाणून घ्या, लॅपटॉप स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग कोणता? कधीच होणार नाही नुकसान
Follow us
| Updated on: Nov 20, 2024 | 8:32 PM

आजकाल मोठ्या प्रमाणावर लॅपटॉपवर काम केले जाते. त्यामुळे लॅपटॉप हे सर्वांसाठीच जवळजवळ आवश्यक असणारे गॅझेट बनले आहे. कार्यालयापासून घरापर्यंत याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. विद्यार्थी असो किंवा व्यावसायीक प्रत्त्येकच जण लॅपटॉपचा वापर करतात. अश्यातच काम करताना बऱ्याच दिवस लक्ष न दिल्याने लॅपटॉपच्या आत धूळ आणि घाण जमा होऊ शकते आणि त्याचा परिणाम लॅपटॉपवर होऊ शकतो.

जर तुम्ही लॅपटॉप वेळीच साफ केलं नाही तर काम करताना वेग कमी होऊ शकतो आणि तो खराबही होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉप ची नियमित साफसफाई करणं खूप गरजेचं आहे. पण लॅपटॉप साफ करताना अनेकदा लोकं काही चुका करतात ज्यामुळे लॅपटॉप खराब होऊ शकतो. चला तर मग आम्ही तुम्हाला लॅपटॉप स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती आहे.

लॅपटॉप साफ करताना या गोष्टी करणे टाळा लॅपटॉप साफ करताना आपण कधीच लिक्विड वापरू नये. त्यातूनही स्क्रीनवर साचलेली धूळ काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे स्प्रे वापरू नका. कीबोर्ड साफ करणं फार कठीण असते तेव्हा पेंट ब्रश तर अजिबातच वापरू नका. लिक्विडही वापरू नका. यामुळे लॅपटॉपचे हार्डवेअर खराब होऊ शकते.

लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी ‘या’ गोष्टींची आवश्यकता

मायक्रोफायबर कापड – लॅपटॉपवरील स्क्रीन आणि बाह्य पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी कंप्रेस्ड एयर: – कीबोर्ड आणि इतर लहान जागांवरील धूळ काढून टाकण्यासाठी. कॉटन बड्स – लॅपटॉपमधील छोटे पार्ट आहेत त्या जागा स्वच्छ करण्यासाठी

लॅपटॉप कसा स्वच्छ करावा

लॅपटॉपची साफसफाई सुरू करण्यापूर्वी तुमचा लॅपटॉप पूर्णपणे बंद आहे का आणि पॉवर सोर्सशी जोडलेला नाही याची खात्री करून घ्या.कीबोर्डमध्ये साचलेली धूळ काढून टाकण्यासाठी कीबोर्ड कंप्रेस्ड एयरचा वापर करा.

लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरून हळुवारपणे स्क्रीन पुसून घ्या. जर स्क्रीनवर डाग असेल तर आपण मायक्रोफायबरचे कापड थोडे से पाण्याने किंवा स्क्रीन क्लीनरने थोडे ओले करून हलक्या हाताने स्क्रीन साफ करून घ्या. तसेच लॅपटॉपचा बाहेरील भाग स्वच्छ मायक्रोफायबर कापडाने पुसून घ्या. तर पोर्ट्स आणि व्हेंट स्वच्छ करण्यासाठी कंप्रेस्ड एयरच्या मदतीने साफ करा.

जर तुम्हाला लॅपटॉपमधील आतील भागांची माहिती असल्यास लॅपटॉप उघडून पंखा स्वच्छ करा आणि कंप्रेस्ड एयरने सिंक गरम करा. लॅपटॉपचे इंटिरिअर साफ करताना खूप काळजी घ्या. त्याचबरोबर टचपॅड स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाचा वापर करा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.