WhatsApp Payments ची कमान Manesh Mahatme यांच्या हाती, अमेझॉन, एअरटेल मनीसोबतचा अनुभव कामी येणार?

व्हॉट्सअ‍ॅपने Amazon चे माजी कार्यकारी मनेष महात्मे (Manesh Mahatme) यांची पेमेंट्स बिझनेस इन इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे.

WhatsApp Payments ची कमान Manesh Mahatme यांच्या हाती, अमेझॉन, एअरटेल मनीसोबतचा अनुभव कामी येणार?
Whatsapp Manesh Mahatme
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 11:53 PM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपने Amazon चे माजी कार्यकारी मनेष महात्मे (Manesh Mahatme) यांची पेमेंट्स बिझनेस इन इंडियाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी घेतल्यानंतर ते युजर्सचा पेमेंट्स अनुभव सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील. ते व्हॉट्सअ‍ॅपच्या डिजिटल आणि फायनॅन्शियल व्हिजनला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात काम करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मनेष यांना सिटी बँक, एअरटेल मनी आणि Amazon सारख्या डिजिटल वित्तीय सेवा आणि पेमेंट्सचा 17 वर्षांचा अनुभव आहे. (WhatsApp appoints Manesh Mahatme as Head of Payments in India)

अमेझॉननंतर मनेष यांनी व्हॉट्सअ‍ॅप जॉईन केलं आहे. Amazon पे इंडियामध्ये त्यांनी डायरेक्टर आणि बोर्ड मेंबर म्हणून 7 वर्षे काम केलं आहे. यावेळी त्यांनी उत्पादन, अभियांत्रिकी आणि ग्रोथ टीम्सचे नेतृत्व केले. व्हॉट्सअ‍ॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस म्हणाले की, मनेष यांनी व्हॉट्सअ‍ॅप जॉईन केल्यापासून ते खूप उस्ताहित आहेत.

बोस म्हणाले की, भारतातील डिजिटल पेमेंट्स ग्रोथसाठी मनेश मुख्य इनोवेटर आहेत. त्यांनी यात उत्तम काम केले आहे आणि आम्ही त्यांच्या अनुभवाचा उपयोग पेमेंट्स आणि व्हॉट्सअ‍ॅपवर विक्रीस प्रोत्साहित करण्यासाठी करू. ते पुढे म्हणाले की, यूपीआय आणि डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून सर्व घटकांना डिजिटल सशक्त बनविण्यासाठी आणि आर्थिक समावेशास प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांना गती देण्याची व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अपार क्षमता आहे.

WhatsApp Payments ची सुविधा सुरु होऊन सहा महिन्यांहून अधिक कालावधी लोटला आहे. परंतु या सुविधेला अद्याप मोठा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता सिटी बँक, एअरटेल मनी आणि Amazon पे सारख्या कंपन्यांसाठी काम करणाऱ्या Manesh Mahatme यांनी WhatsApp जॉईन केल्यानंतर कंपनीची गाडी रुळावर येते का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.

9 सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा फंडा

Step 1 Whatsapp सुरु केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉट्स वर क्लिक करा. Step 2 : Settings ओपन केल्यावर Payments चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा Step 3 : Whatsapp तुम्हाला Bank Account link करण्यास सांगेल. (त्या बँक अकाऊंटशी लिंक्ड असलेलं सिमकार्ड तुमच्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्टिव्हेट असेल, आणि व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट त्याच नंबरशी लिंक्ड असेल, याची खात्री करा) Step 4 : Bank Account link करताना Whatsapp तुम्हाला काही नियम आणि अटींवर (Terms & Conditions) Agree करण्यास सांगेल. तुम्ही I agree बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता. Step 5 : Terms & Conditions स्वीकारल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर Verify करावा लागेल. इथून पुढे यूपीआय (UPI) व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल. Step 6 : मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला विविध बँकांच्या नावांची यादी दिसेल. त्यापैकी तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे. Step 7. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payee Address बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, VPA तयार होईल. (Whatsapp Payment process how to transfer money by whatsapp know all the necessary information) Step 8. व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल (डेबिट कार्डवरील एक्सपयरी डेट, तुमची जन्मतारीख इत्यादी) Step 9. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल?

  • तुमचे बँक अकाऊंट डिटेल अपडेट झाल्यानंतर तुम्ही पैसे ट्रान्सफर किंवा रिसीव्ह करु शकाल.
  • तुमच्या काँटॅक्ट लिस्टमधील ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, त्याचे चॅट ओपन करुन पेमेंट ऑप्शनवर जा.
  • ज्या बँक अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, ते सिलेक्ट करा
  • आता रक्कम टाकून ट्रांझॅक्शन पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका.
  • पिन टाकल्यावर कन्फर्मेशन मेसेजसोबतच तुमचे ट्रांझॅक्शन सक्सेसफुल होईल.

इतर बातम्या

Twitter ची मुजोरी सुरुच, भारताच्या नकाशासोबत छेडछाड, जम्मू-काश्मीर, लडाख वेगळे देश असल्याचं दर्शवलं

स्मार्टफोन विसरा, आता TV मध्ये 48MP कॅमेरा, थिएटरसारख्या साऊंडसह दमदार स्पीकर्स, नवा टीव्ही लाँचिंगच्या मार्गावर

(WhatsApp appoints Manesh Mahatme as Head of Payments in India)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.