WhatsApp : व्हॉट्सॲपची भारतात मोठी कारवाई, देशभरातील 16.6 लाखांपेक्षा जास्त अकाऊंट बंद, का करण्यात आली कारवाई?
तब्बल 16.6 लाखांपेक्षा जास्त खाती बंद करण्यात आली आहे.
मुंबई : व्हॉट्सॲपची (WhatsApp) भारतात मोठी कारवाई झाली आहे. देशभरातील 16.6 लाखांपेक्षा जास्त अकाऊंट बंद करण्यात आल्याची ही मोठी कारवाई भारतात (India) करण्यात आली आहे. यामुळे ही कारवाई का करण्यात आली, अशी चर्चा सध्या रंगली आहे. याच विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नवीन आयटी (IT) नियम 2021चं पालक करत ही कारवाई व्हॉट्सॲपनं केली आहे. तब्बल 16.6 लाखांपेक्षा जास्त खाती बंद करण्यात आली आहे. ‘व्हॉट्सॲपवर नकारात्मक मॅसेज फॅारवर्ड करणं थांबवा’ व्हॉट्सॲप खात्याला ब्लॅाक आणि रिपोर्ट करा. सुरक्षेसाठी रिपोर्ट झालेले अकाऊंट बंद होणं गरजेचं, असं मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेंनी व्यक्त केलंय. याचवेळी त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी देखील सांगितल्या आहेत.
तज्ज्ञांकडून काय सांगण्यात येतंय?
व्हॅाट्सॲपचा वापर करत समाजात तेढ निर्माण करणारे, आणि ज्या व्हॅाट्सॲप अकाऊंटबाबत रिपोर्ट करण्यात आल्याय. एप्रिल महिन्यात भारतातील अशा 16 लाख 60 हजारपेक्षा जास्त व्हॅाट्सॲप अकाऊंट बंद करण्यात आले आहे. भारतात व्हॅाट्सॲपची ही मोठी कारवाई आहे. “ज्या व्हॅाट्सॲप काऊंटबाबत रिपोर्ट करण्यात आलीय, अशा खात्यांना बंद करण्यात आलंय. या व्हॅाट्सॲप खात्यातून समाजात नकारात्मक भावना पसरवली जात होती, या अकाऊंटबाबत ब्लॅाक आणि रिपोर्ट करण्यात आलेय, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. देशाच्या आणि व्हॅाट्सॲप वापरणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई गरजेची आहे. ज्यांना कुणाला एखाद्या व्हॅाट्सॲप खात्याबाबत तक्रार आहे. ते खातं लगेच ब्लॅाक आणि रिपोर्ट करा” असं आवाहन सोशल मिडिया विश्लेषक अजित पारसे यांनी केलंय.
16.6 लाखांपेक्षा जास्त खाती बंद
तब्बल 16.6 लाखांपेक्षा जास्त खाती बंद करण्यात आली आहे. ‘व्हॉट्सॲपवर नकारात्मक मॅसेज फॅारवर्ड करणं थांबवा’ व्हॉट्सॲप खात्याला ब्लॅाक आणि रिपोर्ट करा. सुरक्षेसाठी रिपोर्ट झालेले अकाऊंट बंद होणं गरजेचं, असं मत सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसेंनी व्यक्त केलंय. यामुळे सोशल मीडिया संदर्भातील ही मोठा कारवाई असल्याचं बोललं जातंय आहेय. व्हॉट्सॲप वेळीवेली काही चुकीच्या गोष्टी समोर आल्या की कारवाईचा बडगा उगारतो. मात्र, यंदा सगळ्यात मोठी कारवाई केल्याचं बोललं जातंय. इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाईची ही पहिलीच वेळ असण्याची शक्यता आहे.