WhatsApp मध्ये मोठा बदल, चॅटिंगचा रंगही बदलता येणार
व्हॉट्सअॅपने आपल्या गुगल प्ले स्टोअरमधील बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून नवीन अपडेट 2.20.13 व्हर्जन रोलआऊट (Whatsapp launch new feature) केला आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅपने आपल्या गुगल प्ले स्टोअरमधील बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून नवीन अपडेट 2.20.13 व्हर्जन रोलआऊट (Whatsapp launch new feature) केला आहे. व्हॉट्सअॅपच्या या अपडेटमध्ये यूजर्सला नवनवीन फीचर्स मिळाले आहे. या व्हर्जनमध्ये डार्क थीम लाँच करण्यात आली आहे, अशी माहिती WAbetainfo ट्वीट करुन (Whatsapp launch new feature) दिली आहे.
व्हॉट्सअॅपमध्ये आता डार्क थीम लाँच केल्यामुळे तुम्ही चॅटिंगचा रंग बदलू शकता. ही डार्क थीम कशी दिसेल यासाठी WAbetainfo स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
? WhatsApp beta for Android 2.20.13: what’s new?
WhatsApp to finally release the dark theme for beta testers TODAY!
(Updating screenshots..)https://t.co/iPbStbnTob
— WABetaInfo (@WABetaInfo) January 21, 2020
या फीचरचा उपयोग करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला बीटा अॅप अपडेट करावा लागेल. यानंतर WhatsApp Setting वर जाऊन चाट सिलेक्ट करावे लागेल. यामध्ये चार ऑप्शन मिळेल Light theme, Dark theme, System Default आणि Set by Battery Saver.
दरम्यान, व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरने आता अंधारातही यूजर्स चॅटिंग करु शकतो. यापूर्वी डार्क मोड नसल्यामुळे चॅटिंग करताना डोळयावर प्रकाश पडत असल्याने त्रास व्हायचा. पण आता डार्क मोडमुळे हा त्रास होणार नाही.
Light theme: ही थीम व्हाईट असेल, आपण जशी वापरतो तशीची ही थीम असेल.
Dark theme: ही थीम ब्लॅक आणि डार्क ब्लॅक रंगात दिसेल, ज्याची सर्व यूजर्स वाट पाहत होते.