WhatsApp चे एक पाऊल मागे, प्रायव्हसी अपडेट लांबणीवर, 8 फेब्रुवारीला काय होणार?

युझर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नव्या अटी आणि शर्ती आणत धक्का दिला (WhatsApp delays privacy policy)

WhatsApp चे एक पाऊल मागे, प्रायव्हसी अपडेट लांबणीवर, 8 फेब्रुवारीला काय होणार?
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 9:34 AM

न्यूयॉर्क : WhatsApp ने आपला प्रायव्हसी अपडेट प्लॅन पुढे ढकलण्याचा निर्णय घेत युझर्सना मोठा दिलासा दिला आहे. टीका आणि संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअ‍ॅपने एक पाऊल मागे घेत हा निर्णय घेतला. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना नवीन धोरणं वाचून अटी मान्य करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. 8 फेब्रुवारीला कोणतंही अकाऊण्ट डिलीट होणार नाही, अशी ग्वाही व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. (WhatsApp delays implementation of new privacy policy by 3 months following backlash)

गेल्या काही दिवसांपासून WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणाबाबत अनेक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. “WhatsApp च्या नवीन गोपनीयता धोरणात फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त आहे. आता आधीच्या तुलनेत युझर्सचा अधिक डेटा फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाईल” असं व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं होतं. यातून गोंधळ उडाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

युझर्सना धोरणं समजण्यासाठी अधिक वेळ

8 फेब्रुवारीला कोणाचंही व्हॉट्सअ‍ॅप अकाऊण्ट डिलीट केलं जाणार नाही. गोपनीयता आणि सुरक्षेबाबत पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 15 मे रोजी नवे बिझनेस ऑप्शन्स खुले होण्याआधी युझर्सना आमची धोरणं समजून देण्यासाठी अवकाश देत आहोत, असं व्हॉट्सअ‍ॅपने पुन्हा स्पष्ट केलं.

सिग्नलने ‘सिग्नल’ ओळखला

व्हॉट्सअ‍ॅपवरील डेटा पूर्वीपासूनच फेसबुकसोबत शेअर केला जात होता. परंतु, WhatsApp वरील जवळपास सर्वच माहिती फेसबुक आणि इंस्टाग्रामसोबत शेअर केली जाण्याच्या संभ्रमामुळे युझर्समध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्यामुळे सिग्नल आणि टेलिग्रामसारख्या स्पर्धकांकडे अनेक युझर्स वळले. (WhatsApp delays implementation of new privacy policy)

व्हॉट्सअ‍ॅपचे स्पष्टीकरण

“तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मित्रांसह कुटुंबाशी गप्पा मारता, तुमचं हे चॅटिंग पूर्णपणे सुरक्षित आहे. तुमच्या गोपनीयतेला (प्रायव्हसीला) कोणताही धोका नाही” असं व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या नवीन निवेदनात स्पष्ट केलं होतं. “कंपनी तुमच्या खासगी संदेशांचे संरक्षण करते. कंपनी तुमचे कॉल्स ऐकत नाही किंवा फेसबुकसोबत शेअर करत नाही. तुमच्या गप्पा, ग्रुप्स आणि कॉल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड आहेत. आम्ही कोणत्याही युझरचे लॉग्स (कॉल लॉग्स, चॅट डिटेल्स) सेव्ह करत नाही. तुम्ही कधी आणि कोणाशी बोलत आहात, याबाबतची माहिती आमच्याकडे साठवून ठेवली जात नाही.” असंही व्हॉट्सअ‍ॅपने स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातम्या :

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

तुमचा डेटा फेसबुकसोबत शेअर केला जात नाही, नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

(WhatsApp delays implementation of new privacy policy by 3 months following backlash)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.