अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!

जगभरात सर्वाधिक वापर होत असलेल्या Whatsapp या मेसेजिंग अॅपवर सातत्याने नवनवीन फिचर्स येत आहेत.

अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!
व्हॉट्सअ‍ॅप बर्‍याच वेळा तुम्हाला फॉर्वर्ड केलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवेल. जेणेकरून तुम्ही ते रिव्ह्यू करून डिलीट करू शकता.
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 11:46 AM

मुंबई : जगभरात सर्वाधिक वापर होत असलेल्या Whatsapp या मेसेजिंग अॅपवर सातत्याने नवनवीन फिचर्स येत आहेत. Whatsapp लवकरच अँड्रॉईड युजर्ससाठी फेस अनलॉक फिचर लाँच करणार आहे. व्हॉट्सअॅप त्यांच्या बायोमेट्रिक ऑप्शनला अधिक मजबूत बनवण्यासाठी फेस अनलॉक फिचर देत आहे. नव्या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही तुमचं व्हॉट्सअॅप फेस अनलॉकद्वारे ओपन करु शकता. (Whatsapp face unlock feature on android, spotted in beta update)

अँड्रॉईड त्यांच्या ग्राहकांना (युजर्सना) व्हॉट्सअॅप ओपन करण्यासाठी बायोमेट्रिक ऑप्शन देतं. परंतु सध्या हा ऑप्शन केवळ फिंगरप्रिंट लॉकपर्यंत मर्यादित आहे. आता त्यामध्ये नवीन अपडेट येणार आहे. Whatsapp ने iOS युजर्ससाठी यापूर्वीच फेस अनलॉकचा ऑप्शन दिला आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपने नवीन अपडेट गुगल बीटा प्रोग्राममध्ये सबमिट केलं आहे. त्यामुळे फेस अनलॉक फिचरसाठी अँड्रॉईड युजर्सना फार वाट पाहावी लागणार नाही.

अपकमिंग अँड्रॉईड फीचर सर्वात आधी WABetainfo मध्ये पाहायला मिळालं. त्याचा व्हर्जन नंबर 2.20.203.3 होता. परंतु हे अपडेट कधी रिलीज केलं जाणार आहे, याबाबतची माहिती रिपोर्टमध्ये नमूद केली नाही. दरम्यान याबाबत व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे की, ज्या स्मार्टफोनमध्ये सेन्सर असेल केवळ त्याच फोनमध्ये फेस अनलॉक फिचर सपोर्ट करेल. हे फिचर स्मार्टफोनमध्ये कसं काम करेल, याबाबत तपासण्या सुरु आहेत.

वेब व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना लवकरच व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा मिळणार

व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा असली, तरी वेब वर्जनमधून आतापर्यंत फेसटाईम अर्थात व्हिडीओ कॉल करता येत नव्हते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युझर्ससाठी खुशखबर आणली आहे. लवकरच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेबवरही व्हिडीओ कॉल सेवा उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप काही काळापासून आपल्या वेब सेवेमध्ये बरेच बदल करत आहे. व्हॉट्सअ‍ॅप नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या माध्यमातून व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल करता येत नव्हता. पण नवीन बदलांनंतर व्हॉट्सअ‍ॅप वेबवरुन व्हिडीओ आणि व्हॉईस कॉलही करता येतील.(Web whatsapp new feature for voice and video calls will be availble)

संबंधित बातम्या

…तर तुमचेही WhatsApp चॅट लिक होऊ शकते; त्यापासून बचावासाठी ‘हे’ करा!

भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री

भारतात iPhone 12, iPhone 12 Pro साठी प्री-बुकिंग सुरु, Apple ने ऑफर्सचा पेटारा उघडला

iPhone 12 घेताय? थोडं थांबा, कारण डुअल सिम मोडवर 5G चालणार नाही!

सणासुदीच्या मुहूर्तावर Gionee चा बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 5499 रुपये, जाणून घ्या फिचर्स

‘मेड इन इंडिया’चा नारा देत Micromax भारतीय बाजारात पुनरागमन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Whatsapp face unlock feature on android, spotted in beta update)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.