व्हॉट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! आता Status वर लांब व्हिडीओ अपलोड करणं होणार सोपं
व्हॉट्सॲप स्टेटसवर मोठे व्हिडीओ टाकताना तुकडे करण्याची कटकट लवकरच संपणार आहे. कंपनी व्हिडीओ स्टेटसची मर्यादा ६० सेकंदांवरून वाढवून ९० सेकंद करत आहे.

तुम्हालाही कधी असं झालंय का? एखादा मस्त व्हिडीओ स्टेटसवर टाकायचा, पण त्याची लांबी जास्त असते म्हणून तो तुकड्यांमध्ये कापावा लागतो आणि वेगवेगळे अपलोड करवा लागतो त्यामुळे काय होत तर… गाण्याचा ताल तुटतो, तर कधी मजेदार सीन मध्येच कट होतात आणि सर्व मज्ज निघून जाते. पण हा सगळा ताम – जाम आता लवकरच संपणार आहे! कारण व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी एक नवीन आणि उपयुक्त बदल घेऊन येत आहे ते म्हणजे व्हिडीओ स्टेटससाठी असलेली वेळेची मर्यादा आता ९० सेकंदांपर्यंत वाढवली जाणार आहे!
आतापर्यंत व्हॉट्सॲप स्टेटसवर केवळ ६० सेकंदांचा व्हिडीओ टाकता येत होता. त्यामुळे आवडता व्हिडीओ कितीही सुंदर असला, तरी त्याचे तुकडे करावेच लागत होते. पण व्हॉट्सॲपचा हा नवीन अपडेट आल्यानंतर, तुम्ही थेट ९० सेकंदांपर्यंतचा व्हिडीओ एकाच वेळेस अपलोड करू शकणार आहात.
सध्या ‘Beta Version’ मध्ये फीचर उपलब्ध
व्हॉट्सॲपने हे फीचर अजून सर्वांसाठी ओपन केलेलं नाही. सध्या हे फक्त Android यूजर्ससाठी Beta Version मध्ये टेस्टिंगसाठी उपलब्ध आहे.
जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की हे फीचर तुमच्यामोबाईलमध्ये सुरू झालं आहे का, तर अगदी सोपी पद्धत आहे, व्हॉट्सॲप स्टेटस मध्ये जाऊन एखादा ९० सेकंदाचा व्हिडीओ सिलेक्ट करा. जर तो तुकड्यांमध्ये न कापता पूर्ण अपलोड होत असेल, तर समजा, तुमचं अॅप आधीच अपडेट झालंय!
तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये कधी येणार हे फीचर?
बीटा टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर हे फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी Roll Out होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे थोडंसं वाट पाहा तुमच्या व्हॉट्सॲपवरही लवकरच ९० सेकंदांचा स्टेटस फीचर येणारच!
या अपडेटमुळे व्हिडीओ शेअर करणं आणखी सहज आणि सलग होणार आहे. यामुळे नक्कीच युजर्सचा वेळ वाचेल आणि अनुभवही आणखी चांगला होईल. तर मंडळी, व्हॉट्सॲपच्या या ‘स्टेटस अपडेट’साठी तयार राहा, कारण पुढच्यावेळी व्हिडीओ कापण्याचा त्रास घेण्याची गरजच भासणार नाही!