AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsAppचे येणार दोन नवीन फिचर्स; काय आहे यात खास बात… वाचा

WaBetaInfo च्या अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की "View Past Participants" नावाचे एक नवीन वैशिष्ट्य विकसित होत आहे. अॅपच्या बीटा आवृत्त्यांपैकी एकामध्ये आढळून आलेले हे वैशिष्ट्य होते.

WhatsAppचे येणार दोन नवीन फिचर्स; काय आहे यात खास बात... वाचा
व्हॉट्सअॅप Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 2:27 PM

WhatsApp: आपल्याकडे फोन आल्यापासून त्यात अनेक बदल झाले आहेत. आधी आणि आजही मोबाईलमधून मेसेज (Messages)पाठवणयासाठी आपण टेक्सट मेसेजचा वापर करतो. पण आता मोबाईलमधून मेसेज पाठवणयासाठी आपण मेसेजचा वापर कमी झाला आहे. कारण मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून त्यावर आता चार्ज लावला जात आहे. पण आता ही अडचण ही WhatsAppमुळे दुर झाली आहे. कारण एकदा नेट पॅक मारला की तुम्ही व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर कितीही चाट करू शकता. त्यामुळे सध्या ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे. त्यांच्याकडे WhatsApp हे आहेच. आता जे WhatsApp वापरकर्ते आहेत त्यांच्यासाठी चांगली बातमी आली आहे. WhatsAppमध्ये काही बदल होणार असून त्याचे दोन नवीन फिचर्स (Features) येणार आहेत. ज्यामुळे WhatsAppवापरकर्त्यांना आणखीन सुलभता आणि आनंद मिळणार आहे. तर चला मग जानून घेऊ काय होणार आहे बदल.

फीचर्सची चाचणी सुरू

WhatsApp कडून आपल्या वापरकर्त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी दोन फीचर्सची चाचणी करत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना ग्रुपींग चाटमध्ये सुलभता येईल. सध्या यावर WhatsAppकडून या फीचर्सची चाचणी सुरू आहे. तर या नव्या येणाऱ्या नव्या फिचर्समुळे ग्रुप अॅडमिन्सकची ताकद वाढेल. तसेच तो ग्रुप चॅटमधील नको असलेला कोणताही संदेश हटवू शकेल. तर व्हॉट्सअॅप आता एका नवीन गोष्टीवर काम करत आहे ज्यामुळे युजर्स शांतपणे ग्रुप्समधून बाहेर पडू शकतील. तसेच विशेष म्हणजे, मागे एखाद्याने मेसेज कधी सोडला होता हे देखील यातून कळेल का याचीही चाचणी WhatsApp करत आहे.

View Past Participants

त्याचबरोबर WaBetaInfo च्या अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की “View Past Participants” नावाचे एक नवीन वैशिष्ट्य विकसित होत आहे. अॅपच्या बीटा आवृत्त्यांपैकी एकामध्ये आढळून आलेले हे वैशिष्ट्य होते. जे भूतकाळात आपल्या ग्रुपचा भाग कोण होता हे ग्रुपमधील कोणालाही पाहता येत होते. तर सध्या, जेव्हा एखादा वापरकर्ता ग्रुप सोडतो तेव्हा मेसेजिंग अॅप चॅटमध्ये एक मेसेज येतो की त्याव्यक्तीने ग्रुप सोडला आहे.

हे सुद्धा वाचा

कोणतीही सूचना पाठविली जाणार नाही

व्हॉट्सअॅप देखील अशा एका वैशिष्ट्यावर काम करत आहे जे ग्रुपमधील सहभागी लोकांना ग्रुपमधून बाहेर पडण्याची परवानगी देते आणि कोणालाही कोणतीही सूचना पाठविली जाणार नाही. येथे, भूतकाळातील सहभागींना “View Past Participants” मधून कोणालाही कोणी ग्रुप सोडला किंवा कोणी मेसेज केला होता हे पाहता येत होते. मात्र आता येणाऱ्या नव्या फिचर्समुळे कोण बाहेर पडला किंवा त्यांना मेसेज केला हे पाहता येणार नाही. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे सध्या याच्यावर टेस्टींग सुरू आहे.

तर अशी शक्यता आहे की प्रत्येकाने ग्रुप सोडला आहे हे तपासण्याचा मार्ग पूर्णपणे काढून टाकण्याशिवाय व्हॉट्सअॅप लोकांना आणखी काही गोपनीयता देऊ इच्छित आहे. म्हणून, जर कोणाला जुन्या सहभागींबद्दल जाणून घ्यायचे असेल तर ते गटाच्या प्रोफाइलमध्ये जाऊन तसे करू शकतात. त्यात शेवटी View Past Participants नावाचा पर्याय असेल.

ही वैशिष्ट्ये येण्याची शक्यता

व्हॉट्सअॅप फक्त नाव किंवा जुन्या सहभागींची संख्याच दाखलेव असे नाही हे ही सध्या स्पष्ट नाही. व्हॉट्सअॅपच्या स्थिर आवृत्तीमध्ये ही वैशिष्ट्ये कधी येतील हे ही अद्याप स्पष्ट झालेले नाही. “Silent group exit” वैशिष्ट्य डेस्कटॉप आवृत्तीवर दिसून आले आहे. तर मागे ग्रुपमधील लोकांनी Android बीटा आवृत्तीवर ते पाहीलं आहे. तर स्त्रोतांकडून अशी माहिती मिळते की, नजीकच्या काळात व्हॉट्सअॅपच्या इतर आवृत्त्यांमध्ये ही वैशिष्ट्ये येण्याची शक्यता आहे.

युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार
या गोष्टीत धर्म, जात, पात भाषा आणायच्या नाहीत - शरद पवार.