तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

WhatsApp नेहमीच आपल्या युजर्सना सुरक्षेसाठी अपडेटस देत असते. | Whatsapp message

तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 12:18 PM

नवी दिल्ली: सध्या व्हॉटसअ‍ॅपवर (WhatsApp) एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये पार्ट टाईम नोकरीची जाहिरात केली जात आहे. कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेल्याने साहजिकच लोकांना या जाहिरातीची भुरळ पडत आहे. मात्र, जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास तुमची गोपनीय माहिती चोरली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत अनेकजण या मेसेजला भुलून अडचणीत सापडले आहेत. मात्र, WhatsApp ने अद्याप या समस्येची दखल घेतलेली नाही. (Whatsapp message work from home offer fake message)

WhatsApp नेहमीच आपल्या युजर्सना सुरक्षेसाठी अपडेटस देत असते. जेणेकरून तांत्रिक सुरक्षा भक्कम करून हॅकर्सना दूर ठेवता येईल. मात्र, यानंतरही काहीजण WhatsApp यंत्रणेतील तांत्रिक चूक हेरून गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करतात. सध्या WhatsApp वर फिरत असलेला मेसेज याचे उत्तम उदाहरण आहे.

या मेसेजमध्ये घरबसल्या प्रत्येक दिवशी 3000 रुपये कमवू शकता, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास काम करण्याची गरज असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. साहजिकच अनेकजण या मेसेजवर पटकन क्लिक करतात.

प्रत्येक दिवशी तीन हजारांची कमाई आणि बोनस

या व्हायरल मेसेजमध्ये नव्या युजरला 50 रुपयांचा बोनस मिळेल, असे सांगण्यात आले आहे. या मेसेजमध्ये खालच्या बाजूला एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलमधील बँकेचे पासवर्ड आणि इतर डिटेल्स चोरी होण्याचा धोका आहे.

अनोळखी क्रमांक ब्लॉक करा

या हॅकर्सचे नेटवर्क इतके व्यापक आहे की तुम्हाला वेगवेगळ्या नंबरवरून मेसेज येतात. मात्र, अशाप्रकारच्या अनोळखी मोबाईल नंबरवरून मेसेज आल्यास तो नंबर तात्काळ ब्लॉक करा.

हे मेसेज कसे ओळखाल?

अनेकांना आता याप्रकारच्या मेसेजबद्दल माहिती झाली आहे. त्यामुळे तुम्हाला असा मेसेज आलाच तर तात्काळ तो नंबर ब्लॉक करावा. हे मेसेजे एका विशिष्ट पद्धतीचे असतात. हे मेसेज व्यवस्थित लिहलेले नसतात किंवा त्यामध्ये इंग्रजी भाषेचा कसाही वापर केलेला असतो. अनेकदा हॅकर्स एखाद्या प्रसिद्ध कंपनीच्या नावाने हे मेसेज पाठवतात.

संबंधित बातम्या:

WhatsApp वरुन आरोग्य विमा खरेदीही शक्य, काय आहे योजना?

Whatsapp Payment : 9 सोप्या स्टेप्समध्ये शिका व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा फंडा

(Whatsapp message work from home offer fake message)

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.