AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp Feature : तात्या विंचू, सरपंच वा खडूस! जपा आपल्या मित्रांची खास ओळख, व्हॉट्सॲप आणतंय नवीन फिचर

WhatsApp Feature : व्हॉट्सॲप सध्या युझर्सवर मेहरबान झाले आहे. नवनवीन फिचर्स रोलआऊट करुन बदलत्या जगाचा पासवर्ड हाती ठेवण्याचे काम व्हॉट्सॲप करत आहे.

WhatsApp Feature : तात्या विंचू, सरपंच वा खडूस! जपा आपल्या मित्रांची खास ओळख, व्हॉट्सॲप आणतंय नवीन फिचर
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 11:59 AM

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप (WhatsApp) युझर फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत आहे. इतर मॅसेजिंग ॲपमध्ये (Messaging Apps) नसणारी अनेक फिचर्स लाँच करण्याची कोण घाई मेटा कंपनीला झाली आहे. जगाच्या पाऊलावर पाऊल टाकत, बदलत्या जगाचा पासवर्ड हाती ठेवण्याचे कसब मेटाने आत्मसात केले आहे. आताच व्हॉट्सॲपने मॅसेज एडिट (Message Edit) करण्याचे महत्वाचे फिचर वापरकर्त्यांच्या हाती दिले आहे. त्यामुळे अवघ्या काही मिनिटात तुम्ही केलेली चूक सुधारता येणार तर आहेच. पण संबंध बिघडू नये यासाठीची तजवीजही व्हॉट्सअपने या फिचरच्या माध्यमातून केली आहे. जगातील कोट्यवधी युझर्सला त्याचा फायदा होणार आहे.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या धावपळीच्या दुनियेत मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखाच आहे. आता भावना अत्यंत गतीने बदलत आहे. तुम्हाला योग्य व्हेंटिलेशन मिळालं नाहीतर तुम्ही जीवतंपणीच मुरदाड होता. त्यामुळेच मित्र हे आपल्या आयुष्यातील संजीवनी असतात. प्रत्येक मित्र खास असतो. प्रत्येकाची काही ना काही खोड असते. त्यावरुन आपण त्यांना टोपण नाव पण ठेवतो. कोणी दिलदार सरपंच असतो, कोणी कंजुष तर कोणी लांबच लांब फेकतो म्हणून फेकू असतो. पण एका विशिष्ट टप्प्यानंतर आपण मोबाईलमध्ये त्यांच्या नावानेच नंबर सेव्ह करतो. पण व्हॉट्सॲप मैत्री यादगार बनविण्यासाठी एक खास फिचर आणत आहे.

एडिट फिचर WhatsApp ने एडिट फीचर वापरकर्त्यांच्या हातात दिले आहे. त्याला एक अट पण घातली आहे. जर एखाद्याला त्याने पाठविलेला मॅसेज चुकीचा आहे असे वाटल्यास त्याला 15 मिनिटांच्या आत या फिचरचा वापर करावा लागेल. म्हणजे पंधरा मिनिटांच्या आत त्याला मॅसेज एडिट करावा लागेल. त्यानंतर हा मॅसेज एडिट करता येणार नाही. पण तो मॅसेज डिलिट करण्याचा वापरकर्त्यांचा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्यांना मॅसेज डिलिट करता येईल.

हे सुद्धा वाचा

काय आहे फिचर तर तुम्हाला व्हॉट्सॲप युझरनेम सेट करता येईल. म्हणजे मोबाईलच्या फोन डिरेक्टरीत त्याचे मुळ नाव असेल. तर व्हॉट्सअपच्या युझरनेममध्ये तुम्हाला तुमचा चंगू-मंगू, खडूस, फेकू, भावड्या, बबड्या, पिल्लू, सोनू, मोनू, रामूकाका, पाचंट अशी अनेक मित्र जोडता येतील, त्यांच्या टोपण नावाने ती सेव्ह करता येतील. हे नाव सेव्ह करण्याचे फिचर लवकरच युझर्सच्या हाती असेल.

कधी येणार फिचर तर हे युनिक फिचर लवकरच युझर्सच्या हाती येईल. पण त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. WABetaInfo ने व्हॉट्सॲप या प्रकल्पावर काम करत असल्याचे सांगितले आहे. हे फिचर वापरकर्त्यांना देण्यासाठी तयारी सुरु असून लवकरच ते युझर्सच्या हाती असेल. याविषयीचा एक फोटो लिक झाल्यानंतर याची माहिती समोर आल्याची चर्चा आहे.

या ॲंड्राईड सिस्टिमला सपोर्ट नवीन WhatsApp beta इन्स्टॉल केल्यानंतर गुगल प्ले स्टोअरला Android 2.23.11.15 अद्ययावत केल्यानंतर हे नवीन फिचर दिसल्याचा दावा WABetaInfo ने त्यांच्या अहवालात केला आहे. तर मित्रांनो ही झाली तांत्रिक बाजू, पण तुम्हाला तुमचे जुने दिवस जगता तर येतीलच. पण नवीन पिढीला पण या फिचरच्या माध्यमातून मैत्री जपता येईल हे काय कमी थोडंच आहे..

विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.