दिल की बात जुबां पर नही… WhatsApp स्टिकरवर उतरवा, नवे फीचर्स
तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. WhatsApp ने नवे फीचर आणले आहे. WhatsApp च्या नव्या फीचरमुळे तुम्हाला च्रॅटिंगला आणखी मजा येऊ शकते. कारण, तुमच्या मनातली गोष्ट थेट WhatsApp स्टिकर्समध्ये उतरवता येणार.
‘दिल की बात जुबां पर नही…’ आता थेट WhatsApp स्टिकरवर तुम्ही उतरवू शकता. WhatsApp चे नवे फीचर्स येत आहे. अँड्रॉइड युजर्सला आता चॅटिंगदरम्यान स्टिकर्स शेअरिंगचा अधिक आनंद मिळणार आहे. केवळ गर्लफ्रेंडच नाही तर मित्र-मैत्रिणींसोबतही तुम्ही अप्रतिम स्टिकर्स शेअर करू शकता. लवकरच तुम्ही तुमचे स्टिकर्स कस्टमाईज करू शकाल. स्टिकर फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडू शकता. या अॅडव्हान्स अपकमिंग फीचरबद्दल संपूर्ण तपशील येथे वाचा.
WhatsApp चे नवे स्टिकर फीचर
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर WhatsApp बीटा व्हर्जन 2.24.25.2 मध्ये आले आहे. सध्या या नव्या फीचरची टेस्टिंग सुरू असून, निवडक अँड्रॉइड युजर्सच या फीचरचा फायदा घेऊ शकतात. लवकरच हे फीचर उर्वरित युजर्ससाठीही लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.
आता युजर्स स्वत:चा स्टिकर पॅक तयार करून शेअरही करू शकणार आहेत. याशिवाय संपूर्ण स्टिकर पॅक तुम्ही एकाच वेळी तुमच्या कॉन्टॅक्टसोबत शेअर करू शकाल, यासाठी तुम्हाला वेगळे स्टिकर्स पाठवण्याची गरज भासणार नाही.
स्टिकर पॅकची लिंक शेअर करता येणार
WhatsApp वर तयार करण्यात आलेल्या स्टिकर पॅकची लिंक तयार करून मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करता येणार आहे, तुमचा मित्रही ते थेट डाऊनलोड करू शकणार आहे.
थर्ड पार्टी स्टिकर्सला अडचण नाही
थर्ड पार्टी स्टिकर्समध्ये कोणतीही अडचण येणार नाही, आपण त्यांना लिंक करू शकाल किंवा संपूर्ण पॅक मोठ्या प्रमाणात शेअर करू शकाल.
स्टिकरपॅकही डिलीट करू शकता
यात तुम्हाला मॅनेजमेंटचा पर्यायही मिळेल, तुम्हाला जे स्टिकर पॅक ठेवायचे आहेत ते तुम्ही तुमच्या लायब्ररीत ही ठेवू शकता, तुम्हाला गरज नसलेले स्टिकरपॅकही डिलीट करू शकता. चाचणीचा टप्पा पूर्ण होताच येत्या काही महिन्यांत ही सुविधा सुरू केली जाऊ शकते.
आणखी एक नवे फीचर
WhatsApp वर एक नवीन टायपिंग इंडिकेटरही पाहायला मिळणार आहे. नवीन टायपिंग इंडिकेटर आयफोनच्या आयमेसेज अॅपसारखा दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला टॉपवर शब्द टाईप करण्याऐवजी तीन डॉट्सचा अॅनिमेटेड चॅट बबल दिसेल. हे चॅट स्क्रीनवर च्या ऐवजी खालच्या बाजूला दिसेल. लवकरच हे फिचरही सुरू केले जाऊ शकते.
WhatsApp च्या नव्या फीचरमुळे तुम्हाला च्रॅटिंगला आणखी मजा येऊ शकते. कारण, तुमच्या मनातली गोष्ट थेट WhatsApp स्टिकर्समध्ये उतरवता येणार आहे.