WhatsApp News | डिलीट मॅसेज रिकव्हर करायचे? व्हॉट्सअपचे हे फिचर माहिती आहे का?

WhatsApp News | डिलीट मॅसेज रिकव्हर करण्यासाठी व्हॉट्सअपने फिचर दिले आहे. जाणून घेऊयात या फिचरवर विषयी

WhatsApp News | डिलीट मॅसेज रिकव्हर करायचे? व्हॉट्सअपचे हे फिचर माहिती आहे का?
व्हॉट्सअपचे नवे फिचर Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 4:47 PM

WhatsApp News | व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) मॅसेज डिलीट (deleted Message) करणे अगदी सहज आणि सोप्प काम आहे नाही? युझर्सच्या (Users) सुविधेसाठी व्हॉट्सअपने हे फिचर दिले होते. पण अनेकदा गडबडीत महत्वाचा मॅसेज ही आपण उडवून टाकतो. धाडधाड मॅसेज डिलीट करण्याच्या नादात एखादा आवश्यक आणि गरजेचा संदेश ही स्वाहा होऊन जातो आणि मग आपल्याला तो परत कसा (Recover Message) मिळवायचा यासाठी शोधाशोध सुरु होते. युट्यूबवर व्हिडिओ पहा, गुगल सर्चवरील माहिती वाचा असा उपदव्याप सुरु होतो. पण इच्छित मॅसेज काही मिळत नाही. या समस्येवर आता व्हॉट्सअपनेच तोडगा आहे. वापरकर्त्यांना डिलीट केलेला मॅसेज पुन्हा मिळावा यासाठी, तो रिकव्हर व्हावा यासाठी व्हॉट्सअपने एक फिचर अॅड (Add the Feature) आहे. एका अहवालात याविषयीचा खुलासा करण्यात आला आहे.

WABetainfo नुसार, इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअपने iOS च्या WhatsApp च्या बीटा आवृत्तीवर हा प्रयोग केला आहे. त्यानुसार आयफोन वापरकर्त्यांना या नव्या फिचरचा फायदा मिळेल. त्यांच्या व्हॉट्सअपला हे नवीन फिचर अॅड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हेच फीचर काही दिवसांपूर्वी अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जनमध्ये आणण्यात आले होते.

असे काम करेल फीचर

या अहवालात या फिचरचा वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, युझर्स संदेश पाठवले आणि त्याला तो डिलीट करायचा असेल तर त्याला डिलीट हा पर्याय व्हॉट्सअपमध्ये मिळेल. आता जर वापरकर्त्याने मॅसेज डिलीट केला तर त्याला हा मॅसेज कायमचा डिलिट झालेला दिसेल. आतापर्यंत त्याला मॅसेज रिकव्हर करता येत नव्हता. पण आता युझर्सला मॅसेज रिकव्हर करण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. युझर्सला आता “मेसेज डिलीट” पर्यायावर टॅप करुन एक पर्याय उपलब्ध होणार आहे. तो पर्याय आहे रिकव्हर मॅसेजचा. मॅसेज रिकव्हरचा हे पर्यायी बटण किती वेळा आणि किती दिवसात वापरायचे याविषयी व्हॉट्सअपने काहीच स्पष्ट केलेले नाही. पण हा पर्याय त्या मॅसेजसाठी कायमस्वरुपी नसेल. तसेच डिलीट केलेला मॅसेज पूर्ववत मिळाल्यावर वापरकर्त्याने तो पुन्हा डिलीट केल्यावर तो पुन्हा रिकव्हर करता येईल का याविषयी ही अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

या आवृत्तीत नवीन पर्याय

हे फिचर iOS 22.18.0.70 आवृत्तीसाठी WhatsApp चा हा नवीन पर्याय अॅड करण्यात आलेला आहे. अद्याप काही स्मार्टफोन अथवा आयफोनवर व्हॉट्सअपमध्ये हा पर्याय उपलब्ध झालेला नसेल तर वापरकर्त्यांनी थोडी प्रतिक्षा करावी आणि व्हॉट्सअप अपडेट करावे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक युझर्ससाठी हे फिचर फायद्याचे ठरणार आहे. कारण गडबडीत अनेकदा अथवा नजरचुकीने एकादा महत्वाचा मॅसेज डिलीट होतो आणि मग तो मिळवण्यासाठी ना ना प्रकार केले जातात. त्यांच्यासाठी हे वैशिष्ट्ये फायदेशीर आणि सुलभ ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.