आता जुन्या iPhone मध्ये नाही चालणार whatsapp, तुमचा देखील फोन या यादीत आहे का?

व्हॉट्सॲप नव्या वर्षात जुन्या आयफोनला सपोर्ट करणं बंद करणार आहे. जानेवारीपासून कोणत्या मॉडेल्सना व्हॉट्सॲप सपोर्ट मिळणार नाही, या लिस्टमध्ये कोणत्या फोनचा समावेश आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

आता जुन्या iPhone मध्ये नाही चालणार whatsapp, तुमचा देखील फोन या यादीत आहे का?
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 1:27 PM

तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. येत्या वर्षभरात आता काही आयफोनमध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे म्हणजे तुमच्या या मॉडेल्सच्या आयफोनमध्ये व्हॉट्सॲप चालणार नाहीये. व्हॉट्सॲप कंपनीने त्यांच्या ॲडव्हान्स फीचर्स आणि सुरक्षेच्या चिंतेमुळे आता 2025 सालापासून काही जुन्या आयफोन मॉडेल्समधील सपोर्ट करणे बंद करणार आहे. कारण व्हॉट्सॲप अनेकदा जुन्या डिव्हाइसेस आणि ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणं काही काळानंतर थांबवतं. जेणेकरून तुम्हाला नवीन फीचर्स, ॲडव्हान्स आर्किटेक्चर आणि सिक्युरिटी फीचर्ससह प्लॅटफॉर्म डेव्हलप करण्याच्या हेतूने काम करत असतं. कारण व्हॉट्सॲप आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी प्रत्येक अपडेटवर काम करत असते.

व्हॉट्सॲपने काही जुन्या आयफोनला सपोर्ट बंद करणार असल्याने जुन्या आयओएस व्हर्जनचा वापर करणाऱ्या युजर्सना नोटिफिकेशन पाठवण्यास सुरुवात केली आहे. ज्या आयफोनमध्ये जुनी ऑपरेटिंग सिस्टिम आहे, अशा आयफोनमध्ये येत्या वर्षभरात व्हॉट्सॲपचा सपोर्ट बंद होणार आहे.

या लिस्टमध्ये या फोनचा समावेश आहे

कोणत्या आयफोन मॉडेल्समध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे, याबद्दल बोलायचे झाले तर लिस्टमध्ये या फोनचा समावेश आहे. नोटिफिकेशननुसार, iOS15 च्या आधीचे जुने व्हर्जनला इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणजेच व्हॉट्सॲप सपोर्ट बंद करेल. म्हणजेच ज्यांच्याकडे iOS15 किंवा त्यापेक्षा जुने आयफोन मॉडेल आहे त्यांना व्हॉट्सॲप वापरता येणार नाही.

त्यात लोकांनी लक्षात घ्या की ५ मे २०२५ पर्यंत तुम्ही व्हॉट्सॲप फोनमध्ये चालू शकतात. त्यानंतर व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे.

5 मे पासून व्हॉट्सॲप बंद होणार

सध्या व्हॉट्सॲप हे फक्त आयफोनच्या आयओएस 12 किंवा त्यापेक्षा नवीन मॉडेल्सला सपोर्ट करते. परंतु पुढील वर्षी 5 मे पासून हे प्लॅटफॉर्म फक्त आयओएस 15.1 किंवा त्यापेक्षा नवीन असलेल्या आयफोनला सपोर्ट करणार आहे. .

तुम्ही काय करू शकता?

तसे तर जुन्या सॉफ्टवेअरसह आयफोन मॉडेल्ससह काहीही करता येत नाही, परंतु जर तुमच्या फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स आले असतील तर तुम्ही ते अपडेट केलेच पाहिजे. दरम्यान तुम्ही याचा असा विचार करा – जर तुमचा फोन आयओएस 15.1 ला सपोर्ट करत असेल आणि तुम्ही अजूनही आयओएस 15 किंवा त्यापेक्षा जुने व्हर्जन वापरत असाल तर ते ताबडतोब अपडेट करा. असे केल्यानंतर 5 मे 2025 नंतरही तुम्ही व्हॉट्सॲप सेवा तुमच्या फोनमध्ये वापरू शकाल.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.