लिंकद्वारे मित्रांना कॉलमध्ये सहभागी करुन घ्या, गुगल मीटप्रमाणे WhatsApp कॉल लिंक जनरेट होणार
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) युजर एक्सपीरियन्स आणखी सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. कंपनीने नुकतेच नवीन सर्च ऑप्शन आणि मेसेज रिॲक्शन (WhatsApp Message Reaction) यांसारखे फीचर्स जारी केले आहेत, जे लवकरच ॲपवर अपडेट केले जातील.

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप (WhatsApp) युजर एक्सपीरियन्स आणखी सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. कंपनीने नुकतेच नवीन सर्च ऑप्शन आणि मेसेज रिॲक्शन (WhatsApp Message Reaction) यांसारखे फीचर्स जारी केले आहेत, जे लवकरच ॲपवर अपडेट केले जातील. यासोबतच आणखी एका उपयुक्त फीचरवर कंपनी काम करत आहे जे लवकरच युजर्ससाठी रोलआऊट केले जाऊ शकते. कंपनी अशा फीचरचं टेस्टिंग करत आहे ज्याद्वारे युजर्सना मेसेजिंग ॲपमधील कॉलमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक मिळेल. युजर्स त्या लिंकवर क्लिक करुन व्हॉट्सॲप कॉलमध्ये सहभागी होऊ शकतील. हे फीचर गुगल मीट फीचरसारखंच आहे. यापूर्वी, व्हॉट्सॲप कॉल केल्यानंतर त्यामध्ये इतर युजर्सना जोडण्याची सुविधा आणली होती. आता, ते होस्टला (कॉल करणारा) व्हॉट्सॲप कॉलसाठी (WhatsApp Call) लिंक तयार करण्याची आणि इतर युजर्सना ती लिंक पाठवून त्यांना या कॉलमध्ये आमंत्रित करण्याची सुविधा देईल.
हे फीचर आधीच मेसेंजर रूमवर उपलब्ध आहे. दोघांमधील फरक एवढाच आहे की, कोणीही मेसेंजर रूममध्ये सामील होऊ शकतो, अगदी फेसबुकवर नसलेले युजर्सदेखील या कॉलमध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु व्हॉट्सॲप कॉल्समध्ये केवळ तेच युजर्स सहभागी होऊ शकतात, जे व्हॉट्सॲप युजर्स आहेत. रिपोर्टनुसार, हे फीचर सध्या डेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत आहे. तुम्ही सध्या कॉल लिंक तयार करू शकत नाही, परंतु ॲप येत्या अपडेटमध्ये हे फीचर जारी करण्यावर काम करत आहे.
WhatsApp चं नवीन कॉल लिंक फीचर कसं असेल?
हे अपडेट सर्वप्रथम Wabetainfo ने शेअर केले होते. त्यानुसार व्हॉट्सॲप लवकरच युजर्सना कॉल लिंक वापरून कॉल जॉईन करणे सोपे करणार आहे. होस्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टसाठी लिंक तयार करण्यास सक्षम असेल आणि ती लिंक इतर युजर्ससह शेअर करू शकेल. तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या लोकांनादेखील ही लिंक पाठवता येईल. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की लिंक वापरून WhatsApp वर कॉल करण्यासाठी, युजरकडे व्हॉट्सॅप अकाऊंट नसल्यास त्यांना WhatsApp वर अकाऊंट तयार करावे लागेल. कारण व्हॉट्सअॅप कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित असतात.
बीटा टेस्टिंगदरम्यान दिसणारे बहुतेक फीचर्स ॲपच्या अंतिम अपडेटमध्ये येतात. दरम्यान, व्हॉट्सॲपने अनेकदा टेस्टिंगनंतर काही फीचर्स काढून टाकले आहेत.
इतर बातम्या
गुगल क्रोमचे लाइट मोड फीचर लवकरच बंद होणार, काय आहे नेमके कारण जाणून घ्या!