1 जानेवारीपासून Samsung, Apple, LG आणि Moto च्या ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

काही ठराविक स्मार्टफोन्समध्ये 1 जानेवारीपासून WhatsApp बंद होण्याची शक्यता आहे.

1 जानेवारीपासून Samsung, Apple, LG आणि Moto च्या 'या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 6:47 PM

मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp हे जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. भारतात खूपच कमी स्मार्टफोनधारक असतील ज्यांच्या मोबाईलमध्ये Whatsapp नसले. Whatsapp हे अ‍ॅप अँड्रॉयड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर चांगलं चालतं. परंतु आता काही अँड्रॉईड फोन आणि आयफोन युजर्सना व्हॉट्सॲपचा वापर करता येणार नाही. कारण काही ठराविक फोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होणार आहे. त्यामुळे त्या युजर्सला त्यांचे फोन अपग्रेड करावे लागणार आहे. तर काही स्मार्टफोन्सना व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करण्यासाठी सिस्टिम अपडेट करावी लागणार आहे. (WhatsApp Will Stop Working on These Android And Apple Smartphones)

पुढील वर्षी काही ठराविक मोबाईलमध्ये WhatsApp बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे Samsung Galaxy S2 किंवा iPhone 4 असेल, तर तुम्हाला 1 जानेवारीपासून त्यात व्हॉट्सॲप वापरण्यास अडचण येऊ शकते. कदाचित व्हॉट्सॲप सुरु होण्यासही अडचणी येऊ शकतात. यासोबतच इतरही काही स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही.

या स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार

⦁ Samsung Galaxy S2 ⦁ Apple iPhone 1-4 ⦁ HTC Desire ⦁ HTC Desire S ⦁ LG Optimus Black ⦁ Google Nexus S ⦁ Sony Ericsson Xperia Arc ⦁ Motorola Droid Razr ⦁ 2010 पूर्वी लाँच झालेल्या कोणत्याही अँड्रॉयड फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. (Android devices released before 2010)

मिळालेल्या रिपोर्टनुसार, Android 4.0.3 किंवा यापेक्षा कमी Version वर चालणाऱ्या अँड्राईड स्मार्टफोनवरील WhatsApp बंद होणार आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे या Version वर चालणारे अँड्राईड फोन असतील, तर तुम्हाला व्हॉट्सॲप वापरण्यासाठी ते अपग्रेड करावे लागणार आहे. त्यामुळे आता युजर्सना WhatsApp वापरण्यासाठी Android 4.0.3 च्या पुढचं व्हर्जन असलेले अंड्रॉयडन फोन्स वापरावे लागणार आहेत.

2010 पूर्वी लाँच झालेल्या कोणत्याही अँड्रॉयड फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. इतके जुने स्मार्टफोन्स लोकांकडे असण्याची शक्यता तशी कमीच आहे. परंतु जर कोणाकडे 2010 पूर्वी लाँच झालेले स्मार्टफोन्स असतील तर त्यांना आता व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही.

त्यासोबतच जर तुम्ही आयफोन युजर्स असाल आणि तुमच्याकडे iOS 9 किंवा यापेक्षा जुन्या वर्जनचे सॉफ्टवेअर असेल, तर ते तुम्हाला अपडेट करावा लागेल. त्याशिवाय जर तुमचा फोन फार जुना झाला असेल किंवा तो अपडेट होऊ शकत नसेल, तर मात्र तुम्हाला नवा फोन खरेदी करावा लागेल.

Google Nexus S, HTC Desire S आणि Sony Ericsson Xperia Arc यासारखे स्मार्टफोन काही वर्षांपूर्वी फार प्रसिद्ध होते. मात्र कंपनीने या फोनमध्ये नवीन अपडेट देण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या 1 जानेवारीपासून या स्मार्टफोनमध्ये WhatsApp ची सेवा बंद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान काही स्मार्टफोनमध्ये जुनं iOS आणि अँड्रॉयड OS व्हर्जन आहे. परंतु स्मार्टफोन कंपन्यांनी काही स्मार्टफोन्ससाठी नवीन व्हर्जन दिलं आहे. परंतु त्या स्मार्टफोनधारकांना त्यांचे मोबाईल्स अपडेट करावे लागती. अन्यथ्या त्यांना 1 जानेवारीपासून व्हॉट्सअॅप वापरण्यात अडचणी येतील किंवा त्यांच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी हे स्मार्टफोन्स अपडेट करावे लागणार

⦁ Apple iPhone 4S ⦁ iPhone 5 ⦁ iPhone 5S ⦁ iPhone 6 ⦁ iPhone 6S ⦁ Samsung Galaxy S3 and newer ⦁ Samsung Galaxy Note ⦁ HTC Sensation ⦁ HTC Thunderbolt ⦁ LG Lucid ⦁ Motorola Droid 4 ⦁ Sony Xperia Pro and newer

संबंधित बातम्या

व्हॉट्सअ‍ॅपवर नंबर सेव्ह करणं झालं सोपं, पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया

WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा

तुम्ही व्हॉटसअ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

WhatsApp वरुन आरोग्य विमा खरेदीही शक्य, काय आहे योजना?

(WhatsApp Will Stop Working on These Android And Apple Smartphones)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.