WhatsApp Controversy | सोशल मीडियाबाबतच्या नव्या नियमांमुळे नागरिकांनी घाबरू नये : केंद्र सरकार

व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) सरकारच्या डिजिटल नियमांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात (High Court of Delhi) खटला दाखल केला आहे

WhatsApp Controversy | सोशल मीडियाबाबतच्या नव्या नियमांमुळे नागरिकांनी घाबरू नये : केंद्र सरकार
Ravi Shankar Prasad
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 5:58 PM

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) सरकारच्या डिजिटल नियमांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) खटला दाखल केला आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने असा दावा केला आहे की, सरकारचे नवीन नियम कंपनीकडून वापरकर्त्यांना देण्यात येणाऱ्या एंड-टू-एंड एनक्रिप्शनमध्ये हस्तक्षेप करतात. (WhatsApp users have nothing to fear on new social media rules says IT Minister Ravi Shankar Prasad)

त्यास उत्तर देताना सरकारने असे म्हटले आहे की, ते लोकांच्या ‘गोपनीयतेच्या अधिकाराचा’ आदर करतात आणि त्यांची योजना या अधिकारांचे उल्लंघन करण्यासाठी नाही. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, सरकार लोकांच्या गोपनीयतेचा पूर्ण आदर करतं. सामान्य व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांनी या नवीन नियमांची भीती बाळगण्याची गरज नाही. नियमात नमूद केलेल्या विशिष्ट गुन्ह्यांचा संदेश कोणी सुरु केला, हे शोधणे हा त्याचा मुख्य हेतू आहे.

सरकारकडून टीकेचं स्वागत

रविशंकर प्रसाद म्हणाले की सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवीन नियम बनविण्यात आला आहे. प्रश्न विचारण्याच्या अधिकारासह सरकार टीकेचे स्वागत करत आहे. नियम केवळ सोशल मीडियाच्या सामान्य वापरकर्त्यांना तेव्हा सक्षम करतात जेव्हा गैरवर्तन आणि गैरवापराचे बळी ठरतात.

IT मंत्री पुढे म्हणाले की, आक्षेपार्ह मेसेजच्या पहिल्या ओरिजिनेटरबद्दल माहिती देणे आधीच प्रचलित आहे. हे मेसेज भारताचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, बलात्कार, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्ह्यांशी संबंधित आहेत.

सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात अधिकाऱ्यांची नेमणून करणे गरजेचे

रविशंकर प्रसाद म्हणाले की, नव्या नियमाअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी, अनुपालन अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी लागणार आहे. जेणेकरून सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांकडे तक्रारींचे निवारण करण्यासाठी व्यासपीठ मिळू शकेल.

नवीन नियम 25 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले. या नवीन नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप (ज्यांचे देशात 50 लाखांहून अधिक वापरकर्ते आहेत) यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल. यामध्ये मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी आणि भारत स्थित तक्रार अधिकारी यांची नेमणूक इत्यादींचा समावेश आहे.

इतर बातम्या

नव्या डिजिटल नियमांचे पालन करु; केंद्र सरकारसमोर Facebook ची माघार

…अन्यथा येत्या 2 दिवसांत Facebook, Twitter आणि Instagram बंद होणार?, सरकारचे आदेश धूळखात

(WhatsApp users have nothing to fear on new social media rules says IT Minister Ravi Shankar Prasad)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.