WhatsApp चे मेसेज डिलीट करण्यास मिळणार अधिक वेळ, ‘इतक्या’ दिवसानंतरही डिलीट करू शकाल Chat Message

व्हॉट्सॲप हे सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. त्यांच्या कोट्यावधी युझर्ससाठी व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सॲपने नुकतेच एक नवे अपडेट आणले असून त्याद्वारे युझर्सना चॅट मेसेजेस डिलीट करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी मिळणार आहे.

WhatsApp चे मेसेज डिलीट करण्यास मिळणार अधिक वेळ, 'इतक्या' दिवसानंतरही डिलीट करू शकाल Chat Message
WhatsAppImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 1:37 PM

व्हॉट्सॲप (WhatsApp) हे सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. त्यांच्या कोट्यावधी युझर्ससाठी व्हॉट्सॲप नवनवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सॲपने नुकतेच एक नवे अपडेट जाहीर केले असून त्यामुळे युजर्स भलतेच खुश झाले आहेत. त्यानुसार, एखाद्या युझरने पाठवलेला मेसेज त्यांना दोन दिवसांनंतरही (users will get more time to delete message from whatsapp ) डिलीट करता येणार आहे. याआधी ही मुदत केवळ एका तासाची होती, मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ट्विटरवरील व्हॉट्सॲपच्या अधिकृत अकाऊंटवरून ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर एखादा मेसेज चुकून पाठवला असेल किंवा तुम्हाला एखादा पाठवलेला मेसेज डिलीट करायचा असेल तर आता दोन दिवसांचा अवधी मिळेल.

‘पाठवलेल्या मेसेजबद्दल पुनर्विचार करत आहात? Send केलेले मेसेजेस चॅटमधून डिलीट करण्यासाठी आता २ दिवसांहून अधिक वेळ तुमच्या हातात आहे ‘ असे ट्विट व्हॉट्सॲपच्या अधिकृत अकाऊंटवरून करण्यात आले आहे. हे ट्विट अनेकांना लाइक केले असून हजारांहून अधिक युझर्सनी रिट्विटही केले आहे. या नव्या अपडेटमुळे आता युजर्सना एखादा मेसेज पाठवल्यानंतर डिलीट करण्यासाठी 2 दिवसांहून अधिक वेळ मिळेल. आधी हा अवधी केवळ 1 तासापुरता होता. त्यासाठी त्यांना व्हॉट्सॲप अपडेट करावे लागेल.

Tweet link : https://twitter.com/WhatsApp/status/1556721516968132611

कसा करावा WhatsApp मेसेज डिलीट ?

व्हॉट्सॲपवर एखाद्या व्यक्तीशी चॅट करताना एखादा मेसेज पाठवला जातो. मात्र नंतर तुम्हाला तो डिलीट करायाच असेल तर त्या मेसेजवर टॅप करून काही सेकंद धरू ठेवावे. नंतर त्यात आलेल्या पर्यांयापैकी डिलीटवर क्लिक करावे. अशा रितीने तुमचा मेसेज डिलीट होतो. तुम्ही हा मेसेज फक्त तुमच्यापुरता किंवा सर्वांसाठी डिलीट करू शकता. त्याप्रमाणे Delete for Me / Delete for Everyone हा पर्याय निवडू शकता.

महत्वाची गोष्ट म्हमजे एकीकडे व्हॉट्सॲपद्वारे युजर्सना मेसेज डिलीट करण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आलेला असताना ॲपल कंपनीच्या iMessage मध्ये उलट घडत आहे. यापूर्वी iOS 16च्या बीटा व्हर्जनमध्ये मेसेज डिलीट करण्यासाठी युजर्सना 15 मिनिटे मिळत होती. मात्र आता हाच कालावधी अवघ्या 2 मिनिटे, इतका कमी करण्यात आला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.