WhatsApp मध्ये सिक्रेट चॅटिंगचा कोणताही ऑप्शन नाही. परंतु आपलं चॅट लपवण्यासाठी बरेच लोक अर्काईव्ह चॅटचा वापर करतात.
अर्काईव्ह चॅट चांगला पर्याय आहे खरा, परंतु या ऑप्शनचा एकदा वापर केला आणि त्यानंतर समोरच्या युजरने पुन्हा मेसेज केला तर अर्काईव्ह चॅट पुन्हा ओपन होतं. त्यामुळे तुमचं सिक्रेट चॅट फार वेळ लपून राहात नाही. परंतु यावर आता WhatsApp ने पर्याय शोधून काढला आहे.
WhatsApp ने अर्काईव्ह चॅटमध्ये नवीन अपडेट आणलं आहे, ज्यामध्ये अर्काईव्ह चॅटमध्ये मेसेज आला तरी ते चॅट ओपन होणार नाही. (अर्काईव्ह चॅटमध्ये मसेज आला तरी तो मेसेज लेटेस्ट मेसेजेसमध्ये दिसणार नाही.)
व्हॅकेशन मोड असं WhatsApp च्या या नव्या फिचरचं नाव आहे. हे फिचर युजरला नवीन मेसेज आला तरी चॅट अर्काईव्हमध्येच ठेवणार आहे.
या फिचरचा वापर तुम्ही एखाद्या व्यक्तिला ब्लॉक न करता इग्नोर करण्यासाठीदेखील करु शकता. मुळात कंपनीने हे फिचर ‘इग्नोर आर्काइव्ह चॅट’ या नावानेच डेव्हलप करण्यास सुरुवात केली होती. परंतु नंतर कंपनीने हा प्लॅन रद्द केला.
नुकतच हे फिचर अँड्रॉयड बीटा व्हर्जन 2.20.199.8 मध्ये पाहायला मिळालं आहे. असं म्हटलं जातंय की कंपनीने या फिचरवर पुन्हा एकदा काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये थोडे बदलदेखील करण्यात आले आहेत.