Whatsapp वेब, डेस्कटॉप युजर्सना फोटो एडिटिंगपासून ते डिसअपियरर्यंतचे सगळे फीचर्स मिळणार!

व्हॉट्सअ‍ॅपकडून नेहमी आधी मोबाईल आणि नंतर या दोन्ही (वेब आणि डेस्कटॉप) प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स रोलआऊट केले जातात. उदाहरणार्थ स्टिकर्स आणि फोटो एडिटिंग टूल्स इत्यादी.

Whatsapp वेब, डेस्कटॉप युजर्सना फोटो एडिटिंगपासून ते डिसअपियरर्यंतचे सगळे फीचर्स मिळणार!
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 7:22 AM

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हे मोबाईल अ‍ॅप असले तरी कालांतराने कंपनीने त्यात वेब आणि डेस्कटॉप सपोर्टही जोडला आहे. आधी मोबाईल आणि नंतर या दोन्ही (वेब आणि डेस्कटॉप) प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स रोलआऊट केले जातात. उदाहरणार्थ स्टिकर्स आणि फोटो एडिटिंग टूल्स इत्यादी. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, प्लॅटफॉर्म आता मेसेजिंग अ‍ॅपमध्ये अनेक बदल आणणार आहे. तसेच वेब आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी नवीन फीचर्स दिले जाणार आहेत. या नवीन अपडेटचं व्हर्जन 2.2130.7 असेल. (Whatsapp web and desktop users will get stickers and photo editing tools, check whats new in update)

अहवालानुसार, या व्हर्जनमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे आता व्हॉट्सअ‍ॅप डेस्कटॉप आणि वेबवर फोटो एडिट करता येतील. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, जर हे फीचर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवर रोलआऊट झाल्यानंतर तुम्ही फोटो पाठवण्याआधी व्हॉट्सअ‍ॅप येथे नवीन एडिटिंग पर्याय दाखवेल. याशिवाय तुम्हाला इमोजी, स्टिकर्स, मजकूर जोडण्याचा पर्यायही मिळेल. अशा परिस्थितीत, फोटो एडिटिंगसह, युजर्स आता इमोजी आणि स्टिकर्सचाही आनंद घेऊ शकतात.

सर्वांसाठी रोलआऊट होण्यास बराच वेळ

हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी आजपासून सुरू केले जात आहे. परंतु सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहचण्यास वेळ लागू शकतो, कारण सध्या कंपनीने ते हळूहळू रोलआऊट करणे सुरू केले आहे. दरम्यान, अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या मोबाईल अ‍ॅपसाठी व्ह्यू वन्स फीचर लाँच केलं आहे आहे. या फिचरच्या मदतीने जर तुम्ही एखाद्याला फोटो पाठवला तर तो एकदा पाहिल्यानंतर आपोआप नाहीसा (डिलीट) होईल.

व्हॉट्सअ‍ॅप व्ह्यू वन्स फीचर हे डिसअपीयरिंग मेसेजसारखेच आहे. प्राप्तकर्ता (रिसीव्हर) मेसेज पाहताच तो मेसेज आपोआप डिसअपीयर होतो. याचा अर्थ असा की, आता तुम्ही गोपनीयतेची (प्रायव्हसी) चिंता न करता फोटो पाठवू शकता. त्याचवेळी, इतर युजरने तो फोटो पाहताच, फोटो नंतर गायब होईल. हे फीचर इन्स्टाग्रामच्या व्हॅनिश मोड प्रमाणेच काम करतं.

इतर बातम्या

हेडफोनचे नेमके किती प्रकार असतात? जाणून घ्या सर्वकाही

डेस्कटॉपवरील वायफायचा पासवर्ड शोधायचाय? मग ही ट्रिक नक्की वापरा

डेल्टा व्हेरिएंटची भीती, फेसबुक, गुगलनंतर अमेझॉनकडून कर्मचाऱ्यांच्या Work From Home च्या मुदतीत वाढ

(Whatsapp web and desktop users will get stickers and photo editing tools, check whats new in update)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.