मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp Android आणि iOS दोन्ही युझर्ससाठी वेगवेगळ्या रंगांच्या पर्यायांमध्ये अधिक अॅनिमेटेड हार्ट इमोजी (Emoji) सादर करण्यावर काम करत आहे. सध्या व्हॉट्सअॅप वेब (WhatsApp Web) आणि डेस्कटॉप व्हर्जनवर फक्त लाल हृदयाचा ठोका देणारा इमोजी उपलब्ध आहे. WABetaInfoच्या रिपोर्टनुसार, नवीन इमोजी एकाच हार्ट-बीटिंग अॅनिमेशनमध्ये वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये दिसतील.
रंगांचे पर्याय
रिपोर्टमध्ये एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला गेलाय. यानुसार इमोजी हिरव्या, पिवळ्या, नारंगी, जांभळ्या, काळा, पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतील. रिपोर्टनुसार, हे इमोजी Android आणि iOSसाठी WhatsApp बीटावर उपलब्ध असतील. त्यात असं म्हटलंय, की हे फिचर डेव्हलप होत असल्यानं ते अद्याप बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध नाही, मात्र एक प्रिव्ह्यू पाहू शकता.
टाइम लिमिटसाठीही ऑप्शन्स
व्हॉट्सअॅप आता युझर्सना सर्व नवीन चॅटसाठी बायडिफॉल्ट डिलीट होणारे मेसेज पुन्हा दिसण्यासाठी अनुमती देईल आणि युझर्सना डिसअपीयरिंग मेसेजेससाठी वेळ मर्यादा सेट करण्यास अनुमती देईल. नवीन सेटिंग युझर्सना त्यांच्या डिलीट झालेल्या मेसेजेससाठी एक वेळ मर्यादा सेट करण्याची अनुमती देईल. कंपनी सध्या तीन वेळेचे पर्याय ऑफर करते : 24 तास, 90 दिवस आणि 7 दिवस. टाइम लिमिट इनेबल झाल्यावर सेंडरनं पाठवलेला प्रत्येक मेसेज निर्धारित वेळेनंतर डिलीट होण्यासाठी सेट केला जाईल.
व्हॉट्सअॅपचं नवं व्हॉइस मेसेज प्रिव्ह्यू फीचर
याशिवाय WhatsAppनं त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आणखी एक अपडेट जारी केलंय. यामुळे युझर्सना पाठवण्यापूर्वी व्हॉइस मेसेजचा प्रिव्ह्यू पाहता येवू शकतो. रेकॉर्डिंग पूर्ण करण्यासाठी स्टॉप बटण दाबल्यानंतर, व्हॉइस मेसेज प्रिव्ह्यूचा पर्याय दिसेल. प्ले बटण वापरून तो पाहता येवू शकतो.