फोनवर बोलताना वापरा की इंटरनेट; सेटिंगमध्ये करा असा बदल

Internet : मोबाईलवर कॉल आला तर इंटरनेट बंद पडते. त्यामुळे एखादे ऑनलाईन काम असेल, एखादी फाईल, फोटो पाठवायचा असेल तर तो कॉल कट करुन पाठवावा लागतो. त्यात कार्यालयीन अत्यंत जरुरी काम असेल तर नाहक खोळंबा होतो, या साध्या ट्रिकने तुम्ही ही अडचण सोडवू शकता.

फोनवर बोलताना वापरा की इंटरनेट; सेटिंगमध्ये करा असा बदल
इंटरनेट राहिल सुरु
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 3:32 PM

मोबाईलवर कॉल आला तर इंटरनेट बंद पडते हा नेहमीचाच अनुभव असतो. अनेकदा फोन बोलताना काही फाईल, फोटो पाठवणे गरजेचे असते. अशावेळी मोठी पंचाईत होते. फोन कट करुन थोडावेळ थांबल्यानंतर शेअरिंग होते. ऑनलाईन काही चेक करायचे असेल तर कॉलिंग दरम्यान ही गोष्ट शक्य होत नाही. ऑनलाईन व्यवहार करताना पण ही अडचण येते. पण ही सेटिंग तुम्हाला कळल्यावर कॉलिंग सुरु असताना पण सेटिंगमुळे तुमचे इंटरनेट सुरुच राहिल.

कॉलिंग वेळी असे चालेल इंटरनेट

  1. कॉलिंगच्यावेळी इंटरनेट सुरु राहावे यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील सेटिंमगध्ये बदल करावा लागेल.
  2. सर्वात अगोदर तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा
  3. हे सुद्धा वाचा
  4. सिम आणि नेटवर्क सेटिंग हा पर्याय निवडा. आता सिम या पर्यायावर क्लिक करा
  5. आता ते सिम सलेक्ट करा ज्याची सेटिंग तुम्हाला बदलवायची आहे
  6. स्क्रोल केल्यावर access point names या पर्यायावर क्लिक करा
  7. इंटरनेट या पर्यायावर क्लिक करा. स्क्रोल केल्यावर bearer या पर्यायावर क्लिक करा
  8. त्यानंतर LTE या पर्यायावर क्लिक करा. एलटीई या पर्यायावर क्लिक केल्यावर ओके दाबा

काय होईल फायदा

  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला कॉलिंगवेळी सुद्धा इंटरनेटचा वापर करता येईल. तुम्ही कॉल सुरु असताना व्हॉट्सअपचा वापर करु शकता. गुगल ब्राऊझरवर सर्च करु शकता. आणि युपीआय पेमेंटवरुन सहज व्यवहार करु शकता. यानंतर तुम्हाला इंटरनेट सुरु ठेवण्यासाठी कॉलची सेंटिंग बदलावी लागणार नाही.
  • जर तुमचा मोबाईल सारखा हँग होत असेल तर लागलीच फोन बदलण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या काही सेटिंगद्वारे, त्यातील बदलाद्वरे ही समस्या सोडवू शकता. काही सेटिंग बंद केल्या तर ही समस्या बऱ्यापैकी सुटू शकते.

फोन वारंवार होतो हँग?

तुमचा फोन वारंवार हँग होत असले तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनचे स्टोरेज क्लिअर करा. गरज नसलेल्या फाईल रिमुव्ह करा. गरजेच्या असतील तर त्या पेन ड्राईव्हमध्ये जतन करा. गरज नसलेल्या फाईल डिलिट करा. तुमच्या मोबाईलमधील Apps Update करा. त्यांचे लेटेस्ट व्हर्झन डाऊनलोड करा. बॅकग्राऊंडला गरज नसताना सुरु असलेले Apps बंद करा. फोन पुन्हा सुरु करा.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.