BSNL चे सॅटेलाईट नेटवर्क येतेय! कोणाला वापरता येणार? जाणून घ्या

BSNL च्या नव्या सॅटेलाईट सेवेमुळे मोठा फायदा होऊ शकतो. या सेवेमुळे मोबाईल नेटवर्क किंवा Wi-Fi नसतानाही आपत्कालीन कॉल करणे, SOS मेसेज पाठवणे आणि यूपीआय पेमेंट करणे शक्य होणार आहे. याविषयी खाली विस्ताराने माहिती जाणून घ्या.

BSNL चे सॅटेलाईट नेटवर्क येतेय! कोणाला वापरता येणार? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 5:06 PM

तुम्ही BSNL युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण आता BSNL च्या नव्या सॅटेलाईट सेवेमुळे मोठा फायदा होऊ शकतो. या सेवेमुळे मोबाईल नेटवर्क किंवा Wi-Fi नसतानाही आपत्कालीन कॉल करणे, SOS मेसेज पाठवणे आणि यूपीआय पेमेंट करणे शक्य होणार आहे. याविषयी खाली विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.

बीएसएनएलने डायरेक्ट-टू-डिव्हाईस सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी सादर करण्यासाठी Viasat सोबत सहकार्य केले आहे. याचा उद्देश दुर्गम भागात अधिक चांगली कनेक्टिव्हिटी देणे हा आहे. या सेवेमुळे इमर्जन्सी कॉल, एसओएस मेसेज आणि यूपीआय पेमेंटची सुविधा मिळणार आहे.

बीएसएनएलकडून सातत्याने नवनवीन निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच कंपनीकडून डायरेक्ट टू डिव्हाइस सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे. त्यासाठी बीएसएनएलच्या वतीने Viasat सोबत हातमिळवणी केली होती.

Viasat ही अमेरिकेतील कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी कंपनी आहे. दोन्ही कंपन्या युजर्ससाठी चांगल्या कनेक्टिव्हिटीसह नेटवर्क उपलब्ध करून देत आहेत. अजूनही असे अनेक युजर्स आहेत ज्यांना ही सेवा कशी वापरायची हे माहित नाही. याविषयी जाणून घ्या.

यूपीआय पेमेंट करणे शक्य

या सेवेमुळे मोबाईल नेटवर्क किंवा Wi-Fi नसतानाही आपत्कालीन कॉल करणे, SOS मेसेज पाठवणे आणि यूपीआय पेमेंट करणे शक्य होणार आहे.

बीएसएनएल सॅटेलाईट-टू-डिव्हाइस सेवा म्हणजे काय?

दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. आजही अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे चांगले नेटवर्क उपलब्ध नाही. बीएसएनएल अशा भागात आपत्कालीन कॉल, एसओएस संदेश आणि यूपीआय पेमेंटची सुविधा देत आहे. या भागात वायफाय कव्हरेज नाही, तिथे त्याच्या मदतीने कनेक्ट करता येते. अशापरिस्थितीत या सेवेवर अधिक भर दिला जात आहे.

या सेवेचा वापर कोण करू शकतो?

दुर्गम भागातील वापरकर्त्यांना ही सेवा वापरणे सोपे जाते. त्याचा पुरेपूर वापर कसा करता येईल, हे बीएसएनएलने अद्याप स्पष्ट केलेले नाही. यासाठी तुम्हाला वेगळा प्लॅन घ्यावा लागेल किंवा तुम्ही सध्याच्या प्लॅनसोबत त्याचा वापर करू शकता, हे आतापर्यंत कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार दुर्गम भागात राहणारे लोक या सेवेचा प्रथम वापर करू शकतात.

ट्रायल सुरू?

बीएसएनएलकडून डायरेक्ट-टू-डिव्हाइस सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची चाचणी ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू झाली आहे. बीएसएनएलकडून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सॅटेलाईट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी भारतीयांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....