Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oppo Reno 6 Pro 5G बाजारात, नव्या 5 जी फोनमध्ये काय आहे खास?

भारतातील अत्यंत कंपिटीटिव्ह प्रीमियम स्मार्टफोन बाजारात, देशातील स्मार्टफोन ब्रँड Oppo , जो सर्वाधिक विक्री होणार्‍या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक आहे.

Oppo Reno 6 Pro 5G बाजारात, नव्या 5 जी फोनमध्ये काय आहे खास?
Oppo Reno 6 Pro 5g
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 5:55 PM

मुंबई : भारतातील अत्यंत कंपिटीटिव्ह प्रीमियम स्मार्टफोन बाजारात, देशातील स्मार्टफोन ब्रँड Oppo, जो सर्वाधिक विक्री होणार्‍या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक आहे, या ब्रँडने आपल्या देशात बहुप्रतिक्षित ओप्पो रेनो 6 सिरीज सादर केली आहे. ओप्पोची रेनो सिरीज त्याच्या प्रीमियम लूक आणि अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह लाँच झाली आहे. रेनो 6 5 जी आणि रेनो 6 प्रो 5 जी (Oppo Reno 6 Pro 5G) ची किंमत 29,990 रुपये आणि 39,990 रुपये इतकी आहे. ऑरोरा आणि स्टेलर ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हे स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत. (why to buy Oppo Reno 6 Pro 5G, check features and performance)

यात काही टॉप-एंड व्हेरिएंट्स देण्यात आले आहेत, जे 12 जीबी प्लस 256 जीबीसह येतात. ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी एक ग्लॉसी आणि स्लिम डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. त्याचे वजन 177 ग्रॅम इतके आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा 3 डी कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि सिल्की-स्मूद फील सेटअप आहे. टॉप-लेव्हल गेम खेळायचे असतील, अथवा गेम्स स्विच करायचे असल्यास याचा फायदा होतो.

Oppo Reno 6 Pro 5G मध्ये काय आहे खास?

स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 सह लेटेस्ट फ्लॅगशिप 5 जी-इंटीग्रेटेड एसओसीद्वारे सपोर्टेड आहे. जो 6nm प्रोसेसरवर तयार केला गेला आहे. चिपसेटमध्ये आतापर्यंतचा वेगवान स्मार्टफोन ऑक्टा-कोर सीपीयू आहे. मल्टीटास्किंग दरम्यान, स्मार्टफोन अजिबात मागे राहणार नाही आणि त्यात फेस अनलॉकसह डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज देखील आहे. फोन कंपनीच्या कलरओएस 11.3 वर चालतो. हा स्मार्टफोन 4,500 एमएएच बॅटरी पॅकसह येतो आणि 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यामध्ये 64 एमपी प्रायमरी कॅमेरा, 8 एमपी वाईड-अँगल कॅमेरा, 2 एमपी मॅक्रो कॅमेरा, आणि 2 एमपी मोनो कॅमेरा आहे. पुढच्या बाजूला एक 32 एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे, ज्याला डिस्प्लेच्या वरच्या कोपऱ्यात एक पंच-होल कटआउट देण्यात आला आहे.

इतर बातम्या

अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर; बस्स.. तुम्हाला फक्त ‘ही’ किरकोळ प्रक्रिया करावी लागेल

मजेदार इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब व्हिडिओ बनवायचे आहेत; मग तात्काळ फोनमध्ये इन्स्टॉल करा हे 10 व्हिडिओ एडिटिंग अॅप्स

दरमहा फक्त 99 रुपये द्या आणि 4999 रुपयांचा हा ब्ल्यूटूथ स्पीकरला घरी आणा; जाणून घ्या टेलिकॉम कंपनीचा प्लान

(why to buy Oppo Reno 6 Pro 5G, check features and performance)

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.