जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती WhatsApp नाही तर Signal App वापरतो, कारण काय?
एलन मस्क व्हॉट्सअॅप वापरत नाही, तर त्याला पर्याय म्हणून Signal नावाचं अॅप वापरतात. त्यामुळे हे अॅप काय आहे आणि त्याची खासियत काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.
वॉशिंग्टन : सध्या प्रायव्हसी पॉलिसीत (खासगीपणाचं धोरण) बदल केल्याने WhatsApp चर्चेत आहे. WhatsApp ची सुरुवात ज्या दोन लोकांनी केली होती त्यांनीही व्हॉट्सअॅपचं बिझनेस मॉडेल देखील जाहिरातीप्रमाणे होईल, असा कधी विचारही केला नसेल. मात्र, सध्या व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी नियमांमध्ये अनेक बदल झाले असून प्रायव्हसी कमी झाल्याचा आरोप होत आहे. त्यातच जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांच्या एका ट्विटने या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. स्वतः एलन मस्क व्हॉट्सअॅप वापरत नाही, तर त्याला पर्याय म्हणून Signal नावाचं अॅप वापरतात. त्यामुळे हे अॅप काय आहे आणि त्याची खासियत काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे (Worlds richest person Elon Musk suggest to Signal Chat App instead WhatsApp Know Why).
फेसबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतल्यानंतर त्याच्या प्रायव्हसी पोलिसीत अनेक बदल झालेत. त्यामुळे WhatsApp च्या दोन्ही संस्थापकांनी फेसबुकसोबत मतभेद व्यक्त करत वेगळा रस्ता निवडला. फेसबुकवर याआधी देखील प्रायव्हसीबाबत अनेक आरोप झालेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपने नव्याने केलेल्या बदलांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. काही वर्षांपूर्वीच WhatsApp चे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन एका खासगी मुलाखतीत म्हणाले होते, “व्हॉट्सअॅपने आपली मूळ ओळख गमावली आहे. याचा अर्थ WhatsApp चा मूळ उद्देश युजर्सची प्रायव्हसी पाळणे हा होता आता त्याला हरताळ फासण्यात आलाय.”
अशा स्थितीत एलन मस्क यांनी आपल्या फॉलोवर्सला ट्विट करत सिंग्नल हे अॅप वापरण्याचा सल्ला दिल्याने जगभरात हे अॅप वापरणारांची संख्या अचानक वेगाने वाढत आहे. ही संख्या इतकी वाढली आहे की सिंग्नल अॅपच्या तांत्रिक टीमला नव्याने येणाऱ्या वापरकर्त्यांच्या नोंदणी करण्यात अडचण येत आहे. त्यामुळेच सिग्नलने ट्विट करत याची माहिती दिली.
Use Signal
— Elon Musk (@elonmusk) January 7, 2021
सिग्नलने म्हटलं आहे, “सध्या अनेक लोक सिग्नल अॅप वापरण्यासाठी नोंदणी करत आहेत. त्यामुळे खातं उघडताना येणारा व्हेरिफिकेशन कोड येण्यास उशीर लागत आहे. आम्ही ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काम करत आहोत. लवकरच हा दोष सोडवला जाईल.”
Verification codes are currently delayed across several providers because so many new people are trying to join Signal right now (we can barely register our excitement). We are working with carriers to resolve this as quickly as possible. Hang in there.
— Signal (@signalapp) January 7, 2021
Signal हे इंस्टंट मेसेजिंग अॅप जगातील सर्वात सुरक्षित अॅप मानलं जातं. विशेष म्हणजे सिग्नल अॅप WhatsApp च्या सहसंस्थापकांनीच तयार केलं आहे. यात त्यांचीच गुंतवणूक आहे. त्यांनी हे अॅप करताना खासगीपणाला (प्रायव्हसील) सर्वाधिक महत्त्व दिलंय.
सिग्नल अॅपची वैशिष्ट्ये काय?
Signal अॅपमधील एका फीचरमुळे चॅट करणाऱ्यांपैकी दोघांनाही त्याचे स्क्रीनशॉट घेता येत नाही. हे अॅप इतर कोणत्याही अॅपला देखील चॅटचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही यावर लक्ष ठेवतं.
WhatsApp युजर्सची ओळख, यूसेज डेटा, परचेज डेटा, लोकेशन, कॉन्टॅक्ट, यूजर कॉन्टॅक्ट, यूजर आयडी, डिव्हाईस आयडीपासून जवळजवळ प्रत्येक प्रकारची खासगी माहिती गोळा करतं. मात्र, Signal मध्ये अशी कोणतीही माहिती गोळा केली जात नाही.
अॅपल स्टोअरवर कोणतं अॅप तुमची कोणती व्यक्तिगत माहिती गोळा करतं हे दाखवणारं Data Linked To you हे फीचर आलंय. या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअॅप आणि सिग्नलची तुलना केली तर लक्षात येईल की सिग्नल केवळ तुमचा नंबर नोंदवतं. तेही फोन नंबरवरुनच अकाउंट तयार होते म्हणून. दुसरीकडे WhatsApp मात्र मोठ्या प्रमाणात व्यक्तिगत माहिती गोळ करते.
Signal अॅपचा सोर्स कोड सर्वांना उपलब्ध (पब्लिक डोमेन) आहे. त्यामुळे कोणताही तज्ज्ञ या अॅपची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी तपासणी करु शकतो. तसेच कोणती माहिती गोळा केली जातेय आणि ती कुठे जातेय हे तपासू शकतो. त्यामुळे या अॅपविषयी युजर्सच्या मनात कोणतीही शंका राहत नाही.
Signal अॅपमध्ये खूप लवकर नवे सिक्युरिटी फीचर्स आणि सिक्युरिटी पॅच मिळतात. सिग्नल अॅपमध्ये खूप आधीपासून Disappearing चॅट फीचर उपलब्ध होतं. व्हॉट्सअॅपवर आत्ता कुठे हे फीचर आलंय. Signal चं हे फीचर अधिक सुरक्षित, खासगीपणा सांभळणारं मानलं जातंय.
हेही वाचा :
Good News : आता WhatsAppच्या एकाच क्रमांकावरून चार डिव्हाइस चालणार; लवकरच नवे फीचर्स सेवेत
आता Whatsapp Web ची गरज नाही, लॅपटॉप, कॉम्प्युटरसाठी डिझाईन केलेलं नवं App लाँच
येत्या 1 जानेवारीपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?
Worlds richest person Elon Musk suggest to Signal Chat App instead WhatsApp Know Why