Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12 सीरीजचा स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरीस बाजारात दाखल होणार आहे, ज्यामध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील.

Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
प्रातिनिधिक फोटो (फोटो: mi.com)
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 7:41 PM

मुंबई : Xiaomi 12 सीरीजचा स्मार्टफोन या महिन्याच्या अखेरीस बाजारात दाखल होणार आहे, ज्यामध्ये अनेक चांगले फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. Xiaomi 12 बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स आणि रेंडर्स समोर आले आहेत, ज्याद्वारे या फोनबद्दल बरीचशी माहिती उघड झाली आहे. मात्र भारतात या फोनची किंमत किती असेल, हे अद्याप कळू शकलेलं नाही. (Xiaomi 12 to launch on 28th december; know expected specifications and feature)

Xiaomi 12 च्या मुख्य स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असेल. तसेच, यामध्ये एक कर्व्हड डिस्प्ले दिसेल, जे प्रीमियम फोनमधील फीचर आहे. चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी या मोबाईलमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी उपलब्ध असेल. यामध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळू शकतो.

Xiaomi 12 सिरीजमधील कॅमेरा डिझाइन

Xiaomi 12 मध्ये Huawei Mate 40 Pro Plus प्रमाणेच गोलाकार कॅमेरा सेटअप असेल. लीक रिपोर्टनुसार, Xiaomi 12 सीरीज अंतर्गत तीन मॉडेल्स येतील, ज्यांना Xiaomi 12, Xiaomi 12 Pro आणि Xiaomi 12 Ultra असे नाव दिले जाऊ शकते. Xiaomi 12 सीरीजचे फोन 28 डिसेंबरला बाजारात दाखल होतील.

अंडर डिस्प्ले कॅमेरा

अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की Xiaomi लवकरच मिक्स 4 साठी अंडर डिस्प्ले कॅमेरा तयार करत आहे. अशा परिस्थितीत, जर अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल, तर युजर्सना फुल व्ह्यू डिस्प्लेचा अनुभव मिळतो, जो पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेल्या फोनमध्ये आढळतो. ZTE आणि Samsung Galaxy Fold 3 मध्ये अंडर डिस्प्ले कॅमेरा वापरण्यात आला आहे.

प्रोसेसर

याशिवाय Xiaomi 12 सीरीजच्या फोनवरून अद्याप पडदा हटवण्यात आलेला नाही. अलीकडेच लाँच केलेला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट Xiaomi 12 आणि Xiaomi 12 Pro मध्ये वापरला जाईल. त्याच वेळी, Xiaomi 12X मध्ये स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट वापरला जाईल.

कॅमेरा आणि बॅटरी

गेल्या महिन्यात, Xiaomi 12 च्या कॅमेर्‍यासंबंधीचे तपशील समोर आले होते, ज्यामध्ये या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असल्याचे सांगितले होते. तसेच यामध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा वापर करण्यात आला आहे, जो वाइड अँगल लेन्ससह येईल, असा दावा करण्यात आला होता. तसेच, यात पेरिस्कोप लेन्स आणि टेलिफोटो लेन्स मिळतील. फास्ट चार्जिंगसाठी या फोनमध्ये 100W चा फास्ट चार्जर मिळू शकतो, तर दुसर्‍या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की हा फोन 120W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

Mi ब्रँडिंग बंद

Xiaomi ही स्मार्टफोन निर्माती कंपनी आता Xiaomi Mi 10 आणि Xiaomi Mi 11 च्या यशानंतर Xiaomi 12 सीरीजचा पहिला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Mi हे ब्रँडिंग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने MI हे नाव काढून टाकण्यात आले आहे. म्हणूनच कंपनी आता Xiaomi 12 सीरीज आणणार आहे, ज्याअंतर्गत लवकरच पहिला फोन लॉन्च केला जाईल. Gizmochina ने एका टिपस्टरच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, Xiaomi 12 फोन अंडर डिस्प्ले फीचर्ससह लाँच होईल. मात्र कंपनीने अद्याप या फीचरची पुष्टी केलेली नाही.

इतर बातम्या

रिस्क है तो इश्क है, चांगल्या परताव्यासाठी FD ला बायपास हवा, एफडीपेक्षाही अधिकची कमाई देणारे पर्याय

हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ? 

SBI च्या ग्राहकांना गिफ्ट, एकाच अकाउंटमध्ये तीन सेवा; बचत, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे लाभ

(Xiaomi 12 to launch on 28th december; know expected specifications and feature)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.