सॅमसंगची टेक्नोलॉजी वापरुन शाओमी सर्व कंपन्यांना मागे टाकणार
भारतात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याचे श्रेय पूर्णपणे MI कंपनीला दिले जाते. यानंतर आता सॅमसंगच्या टेक्नोलॉजीचा वापर करत MI कंपनीद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : Xiaomi या चीनी कंपनीने नुकतंच Redmi Note 7 Pro या स्मार्टफोनद्वारे भारतात प्रथमच 48 मेगापिक्सलाचा कॅमेरा लाँच केला आहे. त्यामुळे भारतात 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याचे श्रेय पूर्णपणे MI कंपनीला दिले जाते. यानंतर आता लवकरच MI कंपनीद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात सॅमसंगच्या टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे.
XDA developer या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Xiaomi ही कंपनी लवकरच भारतात 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. MI कंपनी Redmi K20 Pro या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचे दोन अल्ट्रा पिक्सल कॅमेरे लाँच करण्याची शक्यता आहे. याबाबतचे काही कोड्स काही डेव्हलपरला मिळाले आहेत.
दरम्यान Xiaomi या कंपनीने 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र Redmi K20 Pro या फोनच्या लीक झालेल्या माहितीनुसार या फोनद्वारे 64 मेगापिक्सलचे दोन अल्ट्रा पिक्सल कॅमेरे असणार आहेत.
Can you break the darkness with light? Try out with the long exposure feature that we shared before, and share your results with us! ???? pic.twitter.com/ZOBhC8r7Ea
— MIUI (@miuirom) June 17, 2019
विशेष म्हणजे Xiaomi कंपनी 64 मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोनमध्ये सॅमसंग या कंपनीप्रमाणेच ब्राईट GW1 या कॅमेरा सेन्सर बसवण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ Xiaomi कंपनी समसंगच्या टेक्नॉलॉजीचा वापर करत 64 मेगापिक्सलचा कॅमेरा भारतात लाँच करु शकते.
Can you break the darkness with light? Try out with the long exposure feature that we shared before, and share your results with us! ???? pic.twitter.com/ZOBhC8r7Ea
— MIUI (@miuirom) June 17, 2019
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आतापर्यंत फक्त समसंग या एकमेव कंपनीने 64 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर तयार केलं आहे. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या समसंग Galaxy A70 स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र समसंगने या स्मार्टफोनमध्ये केवळ 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
संबंधित बातम्या :
‘Redmi’ चे तीन स्मार्टफोन एकाचवेळी लाँच होणार!
Redmi चा पॉप अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन लवकरच बाजारात, किंमत तब्बल….