स्वस्तातला 5G फोन हवाय? Xiaomi चे दोन स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरात 5G स्मार्टफोन्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये Xiaomi कंपनी आघाडीवर आहे.

स्वस्तातला 5G फोन हवाय? Xiaomi चे दोन स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 7:38 AM

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना 5G चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा समावेश आहे. या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स) ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि तंत्रज्ञान प्रदात्यांसह (टेक्नोलॉजी प्रोव्हायडर्स) म्हणजेच एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT बरोबर भागीदारी केली आहे.

त्याच वेळी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड त्यांनी स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे ट्रायल्सची चाचणी करणार आहे. दरम्यान, देशात 5G Network साठी टेस्टिंग सुरु झाल्यामुळे आता मोबाईल कंपन्या 15000 हून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करण्याचा सपाटा लावणार असल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपन्यांनी किफायतशीर दरात 5G स्मार्टफोन्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये Xiaomi आघाडीवर असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. (Xiaomi going to launch 5G smartphone under 15000 Rs)

Xiaomi Redmi Note 9 5G

या फोनची किंमत 14,590 रुपये इतकी असू शकते. कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोर 2.4 Ghz क्वाड मीडियाटेक डायमेंसिटी 800 प्रोसेसर दिला जाईल. हा फोन 6 जीबी रॅमसह येईल. यामध्ये 6.53 इंचांची IPS LCD स्क्रीन दिली जाईल. कॅमेऱ्याच्या बाबतीत यामध्ये 48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला जाणयाची शक्यता आहे. तसेच यात 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Xiaomi Redmi Note 10 5G

या फोनची किंमत 14,590 रुपये असू शकते. यामध्ये 6.5 इंचांची IPS LCD स्क्रीन दिली जाईल. ज्याचा 90Hz रिफ्रेश रेट असेल. फोनमध्ये ऑक्टा कोर 2.2GHz क्वाड मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. जो 4 जीबी रॅमसह येईल. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा 2MP आणि 2MP ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. फोन डुअल कलर एलईडी फ्लॅशसह येईल. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यामध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट दिला जाईल.

Jio चं स्वतःचं नेटवर्क

रिलायन्स जिओने यापूर्वीच पुष्टी केली आहे की, ते एक स्वदेशी 5 जी नेटवर्क विकसित करणारर आहेत. जिओचे 5 जी नेटवर्क भारतातच विकसित केले जाईल आणि त्याचे पूर्ण लक्ष मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारतावर असेल. त्याच वेळी, एअरटेलने हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवरील यशस्वी 5G चाचणीची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे नेटवर्क 5G तयार आहे आणि आता ते केवळ परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

संबंधित बातम्या

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

(Xiaomi going to launch 5G smartphone under 15000 Rs)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.