अवघ्या 10 मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होणार, ढासू चार्जर लाँच होतोय

आता तुम्ही अवघ्या 10 मिनिटांतच तुमचा फोन पूर्ण चार्ज करु शकाल. कारण शाओमी (Xiaomi) कंपनी 200W फास्ट चार्जर लाँच करु शकते

अवघ्या 10 मिनिटात तुमचा फोन फुल चार्ज होणार, ढासू चार्जर लाँच होतोय
Xiaomi Fast Charging
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 4:28 PM

मुंबई : आता तुम्ही अवघ्या 10 मिनिटांतच तुमचा फोन पूर्ण चार्ज करु शकाल. कारण शाओमी (Xiaomi) कंपनी 200W फास्ट चार्जिंगवर काम करत आहे. कंपनी लवकरच ही टेक्नोलॉजी त्यांच्या आगामी स्मार्टफोन्समध्ये देऊ शकते. परंतु कंपनीने अद्याप सांगितलेलं नाही की, हा चार्जर कधी लाँच केला जाईल. या अपकमिंग टेक्नोलॉजीबद्दल टिप्स्टरने चीनी मायक्रोब्लॉगिग वेबसाईट विबोवर खुलासा केला आहे. (Xiaomi is working on 200W fast charging which can provide full charge in just 10 minutes)

शाओमीच्या या नव्या चार्जरबाबत काही माहिती लीक झाली आहे. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, शाओमी कंपनी 200W वायर्ड आणि वायरलेस चार्जर सादर करु शकते. आतापर्यंत शाओमी कंपनी 120W वायर्ड चार्जिंग, 55W वायरेलस चार्जिंग आणि 10W च्या रिवर्स चार्जिंग क्षमतेपर्यंत पोहोचू शकली आहे.

विशेष म्हणजे अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, आगामी काळात त्यांच्या मोबाईल्सच्या बॉक्समध्ये आता चार्जर दिला जाणार आहे. अशा वेळी शाओमी कंपनी मात्र त्यांच्या ग्राहकांची मागणी ओळखून जास्तीत जास्त फास्ट चार्जिंग सपोर्टसह चार्जर लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच हे चार्जर्स त्यांच्या मोबाईलसोबत दिले जातील. तसेच शाओमी कंपनी फास्ट चार्जिंगसह सध्या फोल्डेबल स्मार्टफोन्सवर काम करत आहे.

एअर चार्ज तंत्रज्ञानावर काम सुरु

शाओमी कंपनीने नुकतीच एक घोषणा केली होती. त्यात कंपनीने म्हटलं होतं की, ते लवकरच एअर चार्ज प्रणाली विकसित करतील. यामध्ये तुम्हाला तुमचा फोन चार्जरद्वारे चार्ज करावा लागणार नाही. तुम्ही केवळ चार्जिंग स्टेशनवर जाऊन उभे राहा तुमचा फोन आपोआप चार्ज होईल. कंपनीने म्हटलं आहे की, ही एअर चार्ज टेक्नोलॉजी 5W पॉवर डिलिव्हर करेल. हळूहळू ही पॉवर वाढवली जाईल. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर केवळ स्मार्टफोनसाठी केला जाईल.

अ‍ॅपलला ट्रोल करणारी सॅमसंग कंपनीसुद्धा ‘या’ स्मार्टफोनसोबत चार्जर आणि इअरफोन्स देणार नाही

सॅमसंगने नुकतेच Galaxy Unpacked 2021 इव्हेंटमध्ये मच-अवेटेड Galaxy S21 सिरीजमधील स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. हे स्मार्टफोन्स रेक्टँग्युलर कॅमेरा मॉड्यूल आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सादर करण्यात आले आहेत. दरम्यान सॅमसंगने त्यांच्या नवीन फोनच्या बॉक्समधून चार्जर आणि ईयफोन्स गायब केले आहेत.

यापूर्वी अॅपल कंपनीने त्यांची आयफोन सिरीज 12 लाँच केली होती. त्यावेळी कंपनीने घोषणा केली होती की, कंपनी आयफोन 12 सोबत चार्जिंग अडॅप्टर आणि मोफ्त इयरफोन्स देणार नाही. तेव्हा सॅमसंगने अॅपल कंपनीला सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं. परंतु आता सॅमसंगने अॅपलच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या नव्या गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील स्मार्टफोन्सच्या बॉक्समधून चार्जर आणि इयरफोन्स हटवले आहेत.

या स्मार्टफोन्सच्या बॉक्समध्ये केवळ स्टार्ट गाईड, युएसबी सी केबल आणि एक सिम इजेक्टर टुल मिळणार आहे. यापूर्वी सॅमसंग किमान AKG ईयरफोन्स तरी बॉक्ससोबत देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, परंतु ते इयरफोन्सदेखील मिळणार नाहीत. त्यामुळे सॅमसंगच्या गॅलेक्सी एस 21 सिरीजमधील महागडे फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकाला चार्जर आणि इयरफोन्ससाठी वेगळे पैसे खर्च करावे लागणार आहेत.

हेही वाचा

तुम्ही पिऊन चालवू नका, आम्ही घरी पाठवू, Uber घरपोच मद्य पोहोचवणार!

6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…

डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच

MediaTek Dimensity प्रोसेसरसह Realme X7 5G सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

(Xiaomi is working on 200W fast charging which can provide full charge in just 10 minutes)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.