Redmi Note 11S पुढील महिन्यात बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

शाओमी (Xiaomi) ने जागतिक बाजारपेठेत आपल्या Redmi Note 11 सिरीजवरील पडदा हटवला आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने चार नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत.

Redmi Note 11S पुढील महिन्यात बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
प्रातिनिघिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 28, 2022 | 6:28 PM

मुंबई : शाओमी (Xiaomi) ने जागतिक बाजारपेठेत आपल्या Redmi Note 11 सिरीजवरील पडदा हटवला आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने चार नवीन मोबाईल लॉन्च केले आहेत. हे मोबाईल फोन रेडमी नोट 11 प्रो (Redmi Note 11 Pro), रेडमी नोट 11 प्रो 5 जी (Redmi Note 11 Pro 5G), रेडमी नोट 11 एस (Redmi Note 11 S) आणि रेडमी नोट 11 (Redmi Note 11) स्मार्टफोन्स आहेत. या स्मार्टफोन्समध्ये AMOLED डिस्प्ले, 120hz डिस्प्ले, फास्ट चार्जिंग आणि 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. दरम्यान, कंपनीने घोषणा केली आहे की, ते 9 फेब्रुवारी रोजी भारतात Redmi Note 11S लॉन्च करणार आहेत.

Redmi Note 11 Pro 5G आणि Redmi Note 11 Pro मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात पंच होल डिझाइन देण्यात आले आहे. हा फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो. Redmi Note 11 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट वापरण्यात आला आहे. तसेच, यात 8 जीबी रॅम आहे. यामध्ये 1 TB पर्यंत स्टोरेज मिळवता येते.

Redmi Note 11 Pro मध्ये MediaTek Helio G96 चिपसेट देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी आहे आणि हा फोन 67 W च्या फास्ट चार्जरसह येतो. Xiaomi ने आधीच जाहीर केले आहे की, Redmi Note 11S आणि Redmi Note 11 हे परवडणाऱ्या सेगमेंटमधील स्मार्टफोन आहेत, त्यापैकी एक फोन लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे.

Redmi Note 11 आणि Redmi Note 11S चे स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11 मोबाईल फोन 5000 mAh बॅटरीसह येतो. यात 33W फास्ट चार्जर आणि 50MP क्वाड कॅमेरा सेटअप आहे. तसेच, यात 3.5mm ऑडिओ जॅक आहे. हा फोन 90Hz पंच होलसह बाजारात दाखल होईल. यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट दिला जाईल. यामध्ये 1 TB पर्यंतचे SD कार्ड इन्सर्ट करता येते.

Redmi Note 11S मध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय, यात 90hz AMOLED डिस्प्ले आणि 108 मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये MediaTek Helio G96 चिपसेट वापरण्यात आला आहे.

स्मार्टफोनच्या किंमती

Xiaomi Redmi Note 11 Pro 5G च्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास याच्या 6GB RAM आणि 64GB स्टोरेजवाल्या व्हेरिएंटसाठी तुम्हाला 329 डॉलर्स (जवळपास 24,636 रुपये) मोजावे लागतील. Redmi Note 11 Pro 5G ची किंमत 299 US डॉलर्स (जवळपास 22,389 रुपये) आहे. यात 6 जीबी रॅम आहे. Redmi Note 11 Pro ची किंमत 299 US डॉलर्स (जवळपास 22,389 रुपये) आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम उपलब्ध आहे. त्याच वेळी, Redmi 11 Pro Non 5G ची किंमत 279 US डॉलर्स (जवळपास 20,892 रुपये) इतकी आहे.

इतर बातम्या

11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स

PHOTO | फिटनेस प्रेमींसाठी लवकरच भारतात येतोय Redmi Smart Band pro.; मोठ्या डिस्प्लेसोबत आहेत आकर्षक फीचर्स !

ओप्पोच्या ग्राहकांसाठी गुड न्यूज…फास्ट चार्जिंग मोबाईलच्या जगात आता ओप्पो ठेवणार पाय, स्मार्टफोन झटपट चार्ज होणार!

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.