12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
Mi अल्ट्रा, Mi 11 प्रो आणि Mi 11 लाइट 5 जी हे स्मार्टफोन्स शाओमीने Mi 11 सिरीजअंतर्गत लाँच केले आहेत. (Xiaomi Mi 11 Series)
बीजिंग : Mi अल्ट्रा, Mi 11 प्रो आणि Mi 11 लाइट 5 जी हे स्मार्टफोन्स शाओमीने Mi 11 सिरीजअंतर्गत लाँच केले आहेत. तसेच या सोबत कंपनीने Mi स्मार्ट बँड 6 देखील लाँच केलं आहे. Mi 11 सिरीजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन्स जोडले आहेत. शाओमी ही सिरीज लवकरच भारतात लाँच करणार आहे. (Xiaomi launches Mi 11 Ultra, Mi 11 Pro, Mi 11 Lite 5G; kno Price, features, specifications)
तिन्ही स्मार्टफोनच्या किंमतींबद्दल बोलायचे झाल्यास यात पहिला नंबर Mi 11 अल्ट्रा या स्मार्टफोनचा लागतो. Mi 11 अल्ट्राची किंमत सुमारे 66,400 रुपये असू शकते. या किटमध्ये आपल्याला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मॉडेल मिळेल. त्याच वेळी, आपल्याला 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसाठी 72,000 रुपये मोजावे लागतील. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 77,500 रुपये इतकी आहे. यात आपल्याला 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. फोन ब्लॅक आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये आहे. त्याच वेळी, व्हाइट सिरॅमिक स्पेशल एडिशन 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह येते, ज्याची किंमत 77, 500 रुपये इतकी आहे.
Mi 11 प्रो 55,400 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे. यात आपल्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 58,700 रुपये आहे. त्याच वेळी, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 63,100 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ग्रीन आणि व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Mi 11 लाइट 5 जी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि या फोनच्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 25,500 रुपये मोजावे लागतील, तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 28,800 रुपये द्यावे लागतील. फोन पिवळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतो. सोमवारी सकाळी 10 वाजता Mi 11 आणि Mi 11 Pro ची विक्री सुरू झाली आहे. हे दोन्ही फोन 2 एप्रिलपासून चीनमध्ये उपलब्ध होतील.
Mi 11 अल्ट्राचे फीचर्स
ड्युअल सिम 5 जी Mi 11 अल्ट्रा Android 11 वर चालतो. फोनमध्ये 6.81 इंचांचा 2k WQHD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. फोनच्या मागील बाजूस सेकेंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1.1 इंचाचा आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 एसओसी आहे जो 12 जीबी एलपीडीडीआर रॅम आणि 512 जीबी स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. ही बॅटरी 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसह देखील येते.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. Mi 11 अल्ट्रा 50 मेगापिक्सेल सॅमसंग जीएन 2 प्रायमरी वाईड अँगल सेन्सरसह दाखल करण्यात आला आहे. यात दोन 48 मेगापिक्सल सोनी IMX586 अल्ट्रा व्हाइट अँगल आणि टेली मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहेत. फोनचा फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा आहे.
Mi प्रो चे फीचर्स
फोनचा डिस्प्ले अगदी M11 अल्ट्रा सारखाच आहे. यात तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 एसओसी प्रोसेसर मिळेल. यात आपल्याला 5000mAh ची बॅटरी मिळेल जी 67 वॅट वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. M11 मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 8 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो कॅमेरा आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये आपल्याला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळेल.
शाओमी Mi 11 लाइट 5 जी स्मार्टफोनचे फीचर्स
हा फोन अँड्रॉयड 10 वर चालतो. जो MIUI 12 सह मिळेल. यात आपल्याला 6.55 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले मिळेल जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 780 जी प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह मिळेल. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. यात 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 4250mAh क्षमतेची बॅटरी आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
इतर बातम्या
एक एप्रिलपासून महागणार आपले फेव्हरेट स्मार्टफोन, झटपट करा खरेदी
Sell Smartphone: जुना मोबाईल चांगल्या किंमतीला विकायचाय; मग ‘या’ 4 वेबसाईटस पाहाच
8GB/128GB, डुअल सेल्फी कॅमेरासह Motorola चा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत…
(Xiaomi launches Mi 11 Ultra, Mi 11 Pro, Mi 11 Lite 5G; kno Price, features, specifications)