Xiaomi ची अ‍ॅपलला टक्कर, Mi Watch Lite लाँच, जाणून घ्या फिचर्स

चीनमध्ये रेडमी वॉच लाँच केल्यानंतर शाओमी (Xiaomi) कंपनीने आता ग्लोबल मार्केटमध्ये Mi Watch लाँच केलं आहे.

Xiaomi ची अ‍ॅपलला टक्कर, Mi Watch Lite लाँच, जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 10:51 PM

मुंबई : चीनमध्ये रेडमी वॉच (Redmi Watch) लाँच केल्यानंतर शाओमी (Xiaomi) कंपनीने आता ग्लोबल मार्केटमध्ये Mi Watch लाँच केलं आहे. कंपनीने अद्याप या स्मार्टवॉचची किंमत जाहीर केली नसली तरी स्पेसिफिकेशन्स आणि डिझाईन पाहून अंदाज बांधता येतोय की, हे वॉच रेडमी वॉचचं रिब्रँडिंग आहे. तसेच Mi Watch मधील फिचर्स हे रेडमी वॉचसारखेच आहेत. (Xiaomi launches Mi Watch Lite with 9-day battery life)

या वॉचमध्ये तुम्हाला स्क्वायर शेप स्क्रीन देण्यात आली आहे. या वॉचचं वजन केवळ 35 ग्रॅम आहे. कंपनीने म्हटलं आहे की, हे वॉच तीन वेगवेगळ्या केसेस आणि पाच वेगवेगळ्या रंगांच्या स्ट्रापमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये पिंक, आयव्हरी, नेव्ही ब्लू, ऑलिव्ह या रंगांचा समावेश आहे. शाओमीचं हे वॉच अॅपलच्या स्मार्टवॉचला टक्कर देईल, असा विश्वास कंपनीला वाटतो. विशेष म्हणजे अ‍ॅपलच्या स्मार्टवॉचपेक्षा एमआय वॉचची किंमत खूपच कमी असेल.

हार्डवेअर आणि डिझाईनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास Mi Watch Lite मध्ये NFC इनेबल आहे जे ब्लुटूथ 5.0 LE ला सपोर्ट करतं. या स्मार्टवॉचमध्ये 320×320 रेजॉल्यूशनसह 1.4 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये ऑटोमेटिक ब्राइटनेस कंट्रोल आणि एंबियंट लाइटनिंग कंडीशनसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. एमआय वॉच प्री इंस्टॉल्ड मल्टीपल फिटनेस मोड्ससह सादर करण्यात आलं आहे.

या वॉचमध्ये तुम्हाला रनिंग, सायक्लिंग आणि इन्डोर स्विमिंग मोड्स देण्यात आले आहेत. वॉच 50 मीटरपर्यंत वॉटर रेजिस्टंट आहे. हे वॉच 24 तासांपर्यंत हार्ट रेट मॉनिटर करतं. यामध्ये स्लीप आणि एक्सरसाईजचे फंक्शन्सदेखील समाविष्ट करण्यात आले आहेत. वॉचमध्ये 9 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. या वॉचमध्ये 230mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी अवघ्या दोन तासांत पूर्णपणे चार्ज करता येते.

कंपनीने या वॉचच्या किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. या वॉचचं ग्लोबल लाँचिंग पूर्ण होईल तेव्हाच याच्या किंमतीबाबतचा खुलासा होईल, असे सांगण्यात आले आहे. लवकरच हे वॉच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. प्रामुख्याने ई-कॉमर्स साईट्सवर हे वॉच सर्वप्रथम पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या 

मोबाईलनंतर Realme च्या Smartwatch चा धुमाकूळ, देशात सर्वाधिक विक्री

जबरदस्त बॅटरी आणि फिचर्स असलेला Timex चा फिटनेस बँड लाँच, किंमत फक्त…

(Xiaomi launches Mi Watch Lite with 9-day battery life; check other features)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.