108MP कॅमेरा आणि शानदार फिचर्स असलेला Xiaomi चा स्मार्टफोन उद्या लाँच होणार, किंमत फक्त…
शाओमी (Xiaomi) कंपनी 2021 मधील त्यांचा पहिला व्हर्चुअल लाँच इव्हेंट होस्ट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
मुंबई : शाओमी (Xiaomi) कंपनी 2021 मधील त्यांचा पहिला व्हर्चुअल लाँच इव्हेंट होस्ट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. कंपनी उद्या (5 जानेवारी) भारतात Mi 10i हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. अधिकृत घोषणेपूर्वी या स्मार्टफोनबाबत अनेक लिक्सद्वारे माहिती जाहीर झाली आहे. मात्र कंपनीने अद्याप या लिक्सबाबत पुष्टी केलेली नाही. कंपनी त्यांच्या या नव्या हँडसेटला ‘Perfect 10’ या नावाने प्रमोट करत आहे. (Xiaomi Mi 10i to launch in India on Jan 5; Check expected price and features)
MI 10i चा लाँचिंग इव्हेंट उद्या तुम्ही शाओमीच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक आणि युट्यूब पेजवर लाईव्ह पाहू शकाल. हा फोन MI 10T lite चं रिब्रँड व्हर्जन आहे. या फोनमध्ये तुम्हाला सेंटरला पंच होल कटआउट मिळेल, जो सेल्फी कॅमेरा आणि स्लिम बेजेल्ससाठी असेल. वॉल्यूम रॉकर, पॉवर बटण आणि फिंगरप्रिंट सेन्सर फोनच्या उजव्या बाजूला असतील. हा फोन अनेक रंगांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन स्क्वायर कॅमेरा मॉड्यूलसह सादर केला जाईल.
शाओमीने Mi 10i मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रिअर कॅमेरा दिला आहे. त्यामुळे हा फोन गॅजेट्सप्रेमींच्या पसंतीस उतरणार आहे. शाओमी इंडिया हेड मनू कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, Mi 10i कंपनीची दुसरी फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Mi 10, Mi 10T आणि Mi 10T Pro चं एक्स्टेंशन असणार आहे. Mi 10 Lite अद्याप भारतामध्ये लाँच झालेला नाही. शाओमीने दिलेल्या माहितीनुसार, Mi 10 मध्ये लावण्यात आलेला i म्हणजे इंडिया. कंपनीच्या सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार, हा फोन सगळ्या भारतीयांसाठी बनवण्यात आला आहे.
स्पेसिफिकेशन्स
आतापर्यंतच्या काही लिक्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये अँड्रॉयड 10 ओएस आणि 8 जीबी रॅम दिला जाईल. फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 750G SoC प्रोसेसर दिला जाईल. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, ज्यामध्ये तुम्हाला 64 मेगापिक्सलची लेन्स मिळेल. फोनमध्ये 6.67 इंचांचा FHD+ डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. या फोनमध्ये 4820mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार असून ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Mi 10i या फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. तसेच फोनमध्ये स्टोरेजसाठी 128 जीबी इंटर्नल मेमरी दिली जाणार असून या फोनची किंमत 20 हजार रुपये असू शकते. कंपनी लाँचिंगच्या वेळी 6 जीबी रॅम असलेलं एक व्हेरियंट सादर करु शकते. हा फोन अमेझॉनच्या वेबसाईटवर लाँचिंगपूर्वीच लिस्ट करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Xiaomi च्या ‘या’ फोनचा मार्केटमध्ये धुमाकूळ, अवघ्या 5 मिनिटात 3.5 लाख स्मार्टफोन्सची विक्री
(Xiaomi Mi 10i to launch in India on Jan 5; Check expected price and features)