Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन

शाओमी कंपनीने त्यांच्या एका प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

Xiaomi कडून या ढासू स्मार्टफोनच्या किंमतीत कपात, स्वस्तात खरेदी करा प्रीमियम स्मार्टफोन
Xiaomi स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 5:00 PM

मुंबई : शाओमी (Xiaomi) कंपनीने त्यांचा मिड-रेंज स्मार्टफोन Mi 10T गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारतात लाँच केला होता. आता कंपनीने या प्रीमियम स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन दोन वेरियंट्समध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत कंपनीने 3 हजार रुपयांची कपात केली आहे. (Xiaomi Mi 10T got price cut of Rs 3,000 in India, know how you can by this phone)

Mi 10T च्या 6GB रॅम असलेल्या वेरियंटची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन आता 32,999 रुपये इतक्या किंमतीत खरेदी करता येईल. तर याच स्मार्टफोनच्या 8GB रॅम असलेल्या वेरियंटची किंमत 37,999 रुपये आहे. 3 हजार रुपयांच्या कपातीनंतर हा स्मार्टफोन 34,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Mi 10T स्मार्टफोनची नवीन किंमत mi.com आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई-कॉमर्स साईट्सवर अपडेट करण्यात आली आहे. तसेच ICICI बँकेच्या कार्डद्वारे तुम्ही हा स्मार्टफन खरेदी केलात तर तुम्हाला 3 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंटही मिळेल. हा फोन खरेदी करताना ग्राहकांना Mi प्रोटेक्टद्वारे स्क्रीनचं अॅक्सिडेंटल आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शनही मिळेल.

दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.97 इंचाचा फुल एचडी (1080×2440 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी दिली आहे. 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Mi 10T या स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला 64 मेगापिक्सल्सचा प्रायमरी सेन्सर, 13 मेगापिक्सल्सची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिली आहे. तर Mi 10T Pro च्या रियरमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स दिली आहे.

4820mAh ची बॅटरी, 108MP चा मेन कॅमेरा, Xiaomi चा नव्या स्मार्टफोनची किंमत फक्त…

नववर्षाच्या सुरुवातीला शाओमी (Xiaomi) या कंपनीने नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. शाओमी या कंपनीने भारतात Mi 10i हा स्मार्टफोन लाँच केला आहे. Mi 10 या स्मार्टफोन सीरिजमधील हा चौथा फोन आहे. 8 जानेवारीपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु करण्यात आली आहे. Xiaomi ने Mi 10i स्मार्टफोनचे तीन वेरिएंट लाँच केले आहेत. यातील 6GB+64GB, 6GB+128GB आणि 8GB+128GB असे तीन वेरिएंट उपलब्ध आहेत.

Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार 999 रुपये इतकी आहे. यात तुम्हाला 6GB+64GB स्टोरेजचा फोन खरेदी करता येऊ शकतो. 6GB+128GB स्टोरेजच्या फोनची किंमत ही 21 हजार 999 रुपये आहे. 8GB+128GB वेरिएंटचा फोन हा 23 हजार 999 रुपये इतका आहे. Xiaomi च्या Mi 10i स्मार्टफोनची विक्री ही अमेझॉन इंडिया आणि mi.com वर 8 जानेवारीपासून सुरु आहे.

Mi 10i हा नवा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे. यात Pacific Sunrise, Midnight Black, Atlantic Blue या तीन रंगांचा समावेश आहे. शाओमीचा Mi 10i हा स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.67 इंच फुल HD+ आहे. या फोनच्या सुरक्षितेसाठी याला पुढे आणि मागे अशा दोन्ही ठिकाणी Corning Gorilla Glass देण्यात आली आहे. हा फोन IP53 रेटींगसोबत येत असल्याने त्याला धुळीपासून कोणतेही नुकसान होणार नाही.

हेही वाचा

Samsung च्या या ढासू स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांहून अधिक डिस्काऊंट

आता 500 रुपयांपेक्षाही कमी प्लॅनमध्ये लुटा अ‍ॅमेझॉन, हॉटस्टार आणि नेटफ्लिक्सची मजा!

(Xiaomi Mi 10T got price cut of Rs 3,000 in India, know how you can by this phone)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.