Xiaomi Mi 11 Pro चा कॅमेरा, डिस्प्ले आणि इतर फिचर्सबाबतची माहिती लीक, पाहा काय आहे खास?
शाओमीची फ्लॅगशिप असलेला स्मार्टफोन Mi 11 Pro मधील फिचर्सची माहिती लीक झाली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शाओमीची (Xiaomi) फ्लॅगशिप असलेला स्मार्टफोन Mi 11 Pro बद्दलची माहिती समोर येत आहे. या बहुप्रतिक्षित स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत आणि किंमतीबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच आता या स्मार्टफोनच्या डिस्प्लेबाबतची माहिती लीक झाली आहे. या फोनमध्ये QHD+ स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे, तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज इतका असेल. (Xiaomi MI 11 pro display and camera specification leaked check everything)
XDA डेव्हलपर्सच्या डिजिटल चॅट स्टेशनद्वारे सांगण्यात आले आहे की, Mi 11 Pro मध्ये QHD+ Resolution असलेल्या डिस्प्ले पॅनल असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज इतका असेल. तसेच इतरही काही डिस्प्ले फिचर्स मिळतील, अशी शक्यता आहे.
Mi 11 Pro च्या काही कॅमेरा फिचर्सबाबत खुलासा झाला आहे. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेला दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सरही मिळेल. या स्मार्टफोनचा कॅमेरा समोर असलेले ऑब्जेक्ट्स डिटेक्ट करु शकतो तसेच AI क्षमतेचा वापर करुन HDR इफेक्ट लेव्हल प्रोव्हाइड करु शकतो.
256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर
Realme ही चिनी स्मार्टफोन कंपनी गेल्या वर्षभरापासून देशातील अनेक मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. कंपनीने आता भारतात X7 सिरीज लाँच करण्याचे ठरवले आहे. X7 सिरीज कधी लाँच होणार याबाबतची कोणतीही माहिती कंपनीने जाहीर केली नसली तरी हा फोन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या सिरीजमध्ये दोन स्मार्टफोन असणार आहेत. X7 आणि X7 प्रो अशी या स्मार्टफोनची नावं असतील.
रियलमी X7 या फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा फोन दमदार आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सेल्सचा सोनीचा IMX686 प्रायमरी सेन्सर दिला जाणार आहे. तसेच 8 मेगापिक्सेलचा अजून एक सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा पोट्रेट सेन्सर, 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर दिला जाईल. तसेच सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेकंडरी कॅमेरा) दिला जाईल. तसेच फोनमध्ये 4500mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे.
संबंधित बातम्या
Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
Xiaomi चा 20 व्हॅटचा फास्ट चार्जर लाँच, IPhone 12, Galaxy s10 सह अनेक फोन चार्ज करणार
Xiaomi ची रेकॉर्डब्रेक विक्री सुरुच, तीन महिन्यात 1.35 कोटी स्मार्टफोन्सची विक्री
(Xiaomi MI 11 pro display and camera specification leaked check everything)