फक्त 45 दिवसात 300 कोटींची उलाढाल, Xiaomi च्या ‘या’ मोबाईल फोनचा धमाका

Xiaomi कंपनीने Mi 11 Series चे  मोबाईल फोन लॉन्च केल्यानंतर अवघ्या 45 दिवसांत कंपनीने तब्बल 300 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

फक्त 45 दिवसात 300 कोटींची उलाढाल, Xiaomi च्या 'या' मोबाईल फोनचा धमाका
Mi 11X आणि Mi 11X Pro
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 8:38 PM

मुंबई : मोबाईल उत्पादक कंपनी Xiaomi ने अत्यंत कमी काळात बाजारपेठेत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. कमी किमतीमध्ये दमदार फिचर देणारी कंपनी अशी Xiaomi ची ओळख झाल्यामुळे सध्या या कंपनीवर लोकांचा विश्वास निर्माण झाला आहे. म्हणूनच की काय Mi 11 Series चे  मोबाईल फोन लॉन्च केल्यानंतर अवघ्या 45 दिवसांत कंपनीने तब्बल 300 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

Mi 11X तसेच Mi 11X Pro मोबाईल्समध्ये रिव्हॉल्यूशनरी कॅमरा

शाओमीने Mi 11X तसेच Mi 11X Pro या आपल्या नव्या मोबाईल्समध्ये रिव्हॉल्यूशनरी कॅमरा, नवे फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 870 आणि 888 प्रोसेसर दिले आहे. त्यासोबतच या मोबाईल्सना पॉवरफुल डॉल्बी स्टीरिओ स्पीकर, 120 Hz E4 सुपर AMOLED डिस्प्ले तसेच फास्ट चार्जिंगची क्षमता असलेली बॅटरी दिलेली आहे.

ग्राहकांचे आभार मानतो

कंपनीने केलेल्या उलाढालीबद्दल एमआय स्मार्टफोनचे व्यवसाय प्रमुख विवेक कुमार यांनी अधिक सांगितले आहे. “सध्या लॉन्च करण्यात आलेल्या मोबईलने अवघ्या 45 दिवसांत 300 कोटी रुपयांची उलाढाल केली. ही उलाढाल एमआईचे प्रोडक्ट जनतेने स्वीकारले असल्याचे द्योतक आहे. ग्राहकांनी अशा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवला. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो,” असे विवेक कुमार म्हणाले.

Mi 11X आणि Mi 11X Pro ची विशेषता काय आहे ?

मिड-रेंज Mi 11X आणि Mi 11X Pro स्मार्टफोन तीन रंगांत उपलब्ध आहेत. कॉस्मिक ब्लॅक, लूनर व्हाईट तसेच मॅजिक सेलेस्टियल सिल्व्हर रंगामध्ये हे फोन उपलब्ध आहेत.

Mi 11X Pro ची किंमत काय ?

Mi 11X Pro चे पहिले मॉडेल 8GB RAM तसेच 128GB स्टोअरेज क्षमतेचे असून त्याची किंमत 39,999 रुपये आहे. तर दुसरे मॉडेल हे 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज क्षमतेचे असून त्याची किंमत 41,999 रुपये आहे. या मोबाईलमध्ये 108 MP+ 8MP + 5MP ट्रिपल कॅमेरा सेन्सर प्रोव्हाईड करण्यात आले आहे. तसेच या मॉडेलची स्क्रीन 6.67 इंच असून चार्चिंगसाठी 4520 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Mi 11X चि किंमत काय ?

Mi 11X सीरिजमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर 8GB RAM आणि 128GB स्टोअरेज क्षमता असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. या मॉडेलमध्ये 48MP + 8MP + 5MP क्षमतेचा कॅमेरा देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये मोबईलची स्क्रीन ही 6.67 इंच एवढी असून बॅटरीची क्षमता 4520 mAh एवढी आहे.

इतर बातम्या :

Samsung Galaxy S21+ वर 10000 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

8GB/256GB, 64MP ट्रिपल कॅमेरासह iQOO Z3 बाजारात, किंमत 20 हजारांहून कमी

128GB स्टोरेज, 5000mAh बॅटरीसह देशातील सर्वात स्वस्त 5G फोन लाँच

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.