भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले Xiaomi, Realme चे स्मार्टफोन्स महागले
Xiaomi आणि Realme या कंपन्यांनी अनेक स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. शाओमीने यापूर्वीही रेडमी नोट 10 च्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे.
मुंबई : Xiaomi आणि Realme या कंपन्यांनी अनेक स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या आहेत. शाओमीने यापूर्वीही रेडमी नोट 10 च्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. कंपनीने त्याची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. एकूणच, रेडमी नोट 10 लाँच झाल्यापासून आतापर्यंत या फोनच्या किंमतीत 2000 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. या बाबतीत पोको कंपनीदेखील मागे नाही. कंपनीने आपल्या पोको एम 3 या स्मार्टफोनची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. दुसरीकडे, Realme ने आपल्या पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. (Xiaomi, Realme’s popular smartphones among Indian consumers have become more expensive)
Redmi Note 10 च्या 4 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी आता ग्राहकांना 13,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत अजूनही 15,499 रुपये आहे. 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Redmi Note 10S च्या बेस व्हर्जनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू होते. पोको M3 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 10,999 रुपयांपासून सुरू होते. दुसरीकडे, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह मिड-टियर व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.
दुसऱ्या बाजूला स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आपल्या पाच स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे, या यादीत Realme C25s, Realme C21, Realme C11, Realme 8 आणि Realme 8 5G या स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने Realme C21 च्या किंमतीत 300 रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर Realme C25 आणि Realme C25s खरेदी करण्यासाठी आणखी 500 रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, जर तुम्ही Realme 8 आणि Realme 8 5GB खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला यासाठी 1500 रुपये अधिक मोजावे लागतील.
Realme C11 सिरीजच्या वाढलेल्या किंमती
- Realme C11 च्या 2GB RAM आणि 32GB स्टोरेजवाल्या फोनची किंमत आता 7,299 रुपये झाली आहे. या फोनची आधीची किंमत 6,999 रुपये इतकी होती.
- 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme C11 फोनची किंमत आता 8,499 रुपयांवरून 8,799 रुपये झाली आहे.
Realme C21 सिरीजच्या वाढलेल्या किंमती
- 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या Realme C21 फोनची किंमत आता 8,499 रुपयांवरून 8,999 रुपये झाली आहे.
- 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme C21 फोनची किंमत आता 9,999 रुपये झाली आहे, जी आधी 9,499 रुपये होती.
Realme 8 सिरीजच्या वाढलेल्या किंमती
- 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 या फोनची किंमत आता 15,999 रुपये झाली आहे, जी आधी 14,499 रुपये होती.
- 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 च्या फोनची किंमत आता 16,999 रुपये झाली आहे, जी आधी 15,499 रुपये होती.
- 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 या फोनची किंमत आता 17,999 रुपये झाली आहे, जी आधी 16,499 रुपये होती.
Realme C25s सिरीजच्या वाढलेल्या किंमती
- 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme C25s फोनची किंमत आता 10,499 रुपयांवरून 10,999 रुपये झाली आहे.
- 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme C25s फोनची किंमत आता 11,999 रुपये झाली आहे, जी आधी 11,499 रुपये होती.
Realme 8 5G सिरीजच्या वाढलेल्या किंमती
- 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Realme 8 5G फोनची किंमत आता 13,999 रुपयांवरून 15,499 रुपये झाली आहे.
- 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 5G फोनची किंमत आता 14,999 रुपयांवरून आता 16,499 रुपये झाली आहे.
- 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या Realme 8 5G फोनची किंमत आता 18,499 रुपये झाली आहे, जी आधी 16,999 रुपये होती.
इतर बातम्या
6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात
17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा
30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…
(Xiaomi, Realme’s popular smartphones among Indian consumers have become more expensive)