Redmi Note चा दमदार स्मार्टफोन लवकरच बाजारात, कॅमेऱ्यासह फीचर्सची जोरदार चर्चा

Redmi Note | रेडमी लवकरच भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहेत. ब्रँडने Redmi Note 13 मधील नवीन स्मार्टफोनची झलक दाखवली आहे. हा नवीन फोन पुढील वर्षात, जानेवारीमध्ये बाजारात दाखल होणार आहे. या फोनमध्ये कंपनीने 200MP कॅमेरा आणि इतर फीचर्स दिले आहेत. काय काय आहे या स्मार्टफोनमध्ये

Redmi Note चा दमदार स्मार्टफोन लवकरच बाजारात, कॅमेऱ्यासह फीचर्सची जोरदार चर्चा
Follow us
| Updated on: Dec 12, 2023 | 1:49 PM

नवी दिल्ली | 12 डिसेंबर 2023 : Xiaomi पुन्हा बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. Redmi Note 13 pro plus ची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. रेडमी नोट 13 सीरीजचा नवीन फोन बाजारात येत आहे. हा स्मार्टफोन यापूर्वी चीनमध्ये ग्राहकांच्या हाती आला आहे. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने तो बाजारात आणण्याची तयारी सुरु केली आहे. जगातील अनेक देशात हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. पुढील वर्षांच्या सुरुवातीलाच, जानेवारी 2024 मध्ये Redmi Note 13 pro plus चा हँडसेट ग्राहकांच्या हाती असेल. यामध्ये 5000mAh ची बॅटरी, 120W चे फास्ट चार्जिंग आणि दमदार प्रोसेसर मिळेल. जाणून घ्या काय आहेत, या स्मार्टफोनचे फीचर्स…

भारतात केव्हा दाखल होणार हा स्मार्टफोन

कंपनीने Redmi 13C च्या लाँचिंग दरम्यान नवीन Redmi Note 13 Pro Plus झलक दाखवली होती. हा फोन येत्या जानेवारीत भारतीय बाजारात दाखल होत आहे. कंपनीने अजून लाँचिंग डेट जाहीर केलेली नाही. Redmi 13C चा लाँचिंग इव्हेंट Redmi Note 13 pro plus च्या दमदार कॅमेऱ्यात शूट करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा कॅमेरा असेल.

हे सुद्धा वाचा

काय आहेत फीचर्स

  • Redmi Note 13 Pro Plus मध्ये 6.67 इंचचा AMOLED डिस्प्ले असेल. स्क्रीन संरक्षणासाठी Coring Gorilla Glass Victus देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह मिळेल. हा कॅमेऱ्याचा मुख्य लेन्स 200MP चा असेल
  • या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रावाईड एंगल लेन्स आणि 2MP मायक्रो लेन्स मिळेल. फ्रंटमध्ये कंपनी 16MP सेल्फी कॅमेरा देणार आहे. स्मार्टफोन Android 13 वर आधारीत MIUI 14 वर काम करत आहे. या मोबाईलमध्ये 5000Ah बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W ची फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • या मोबाईलमध्ये 16 GB पर्यंत RAM आणि 512 GB पर्यंत स्टोरेज मिळेत. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरची क्षमता वाढवता येते. फोनच्या किंमतीविषयी अजून माहिती समोर आलेली नाही. पण लूक आणि डिझाईनने ग्राहकांचे मन वेधून घेतले आहे.
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.