Xiaomi चा 20 व्हॅटचा फास्ट चार्जर लाँच, IPhone 12, Galaxy s10 सह अनेक फोन चार्ज करणार
Apple कंपनीने नुकताच iPhone 12 हा स्मार्टफोन लाँच केला. मात्र या मोबाईलसोबत चार्जर न देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
बीजिंग : Apple कंपनीने नुकताच iPhone 12 हा स्मार्टफोन लाँच केला. मात्र या मोबाईलसोबत चार्जर न देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान व्हावे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. परंतु Iphone चे अनेक चाहते कंपनीच्या या निर्णयावर नाराज आहेत. अॅपल कंपनीच्या या निर्णयावर Xiaomi ने उत्तर शोधलं आहे. शाओमीने 20 व्हॅटचा यूएसबी टाइप सी पॉवर डिलिव्हरी (PD) अडॅप्टर लाँच केला आहे. या अडॅप्टरद्वारे iPhone 12 सह अनेक फोन चार्ज करता येतील. (Xiaomi unveils 20W USB C fast charger compatible with iphone 12, Samsung Galaxy s10 and Xiaomi 10)
हा अडॅप्टर नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत 39 युआन (जवळपास 434 रुपये) आहे. 3 नोव्हेंबरपासून या अडॅप्टरची विक्री सुरु होणार आहे. हा चार्जर iPhone 12 सह Xiaomi 10, iPhone 11 हे फोन फास्ट चार्ज करतो. तसेच याद्वारे Samsung Galaxy s10, आयपॅड प्रो आणि स्विचसुद्धा चार्ज करु शकतो.
शाओमी 20 व्हॅट टाईप-C चार्जर पांढऱ्या रंगाचा आहे. याचं वजन 43.8 ग्रॅम आहे. यामध्ये हाय प्रीसिजन रेजिस्टन्स कॅपेसिटिंग सेन्सिंग डिव्हाईसचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ओव्हर-व्होल्टेज प्रोटेक्शन, ओव्हर करन्ट प्रोटेक्शन, शॉर्ट-सर्किट प्रोटेक्शन ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शनसारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यामध्ये अँटी-इलक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफियरन्स, लो रिपलसारखे फिचर्सही आहेत.
अॅपल कंपनी iPhone 12 च्या बॉक्समध्ये चार्जर देत नसली तरी सोबत एक यूएसबी टाइप-सी टू लाइटनिंग केबल देत आहे. या केबलद्वारे युजर यूएसबी टाईप सी च्या मदतीने आपला फोन चार्ज करु शकतो. तसेच या फोनमध्ये कंपनीने वायरलेस चार्जिंगचं फिचरही दिलं आहे.
संबंधित बातम्या
भारतात iPhone 12, iPhone 12 Pro साठी प्री-बुकिंग सुरु, Apple ने ऑफर्सचा पेटारा उघडला
Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या ‘या’ बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट
Redmi K30S लाँच, 8 जीबी रॅम, 5000mAh च्या बॅटरीसह दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत
Motorola चा किफायतशीर 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
(Xiaomi unveils 20W USB C fast charger compatible with iphone 12, Samsung Galaxy s10 and Xiaomi 10)