आता Paytm मध्ये पिन न टाकताच करता येणार पेमेंट, कसं काम करतं नवं फीचर जाणून घ्या

भारतात पेटीएम हे पेमेंट अ‍ॅप बहुतांश युजर्स वापरतात. या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे.

आता Paytm मध्ये पिन न टाकताच करता येणार पेमेंट, कसं काम करतं नवं फीचर जाणून घ्या
Paytm च्या नव्या फीचरबाबत उत्सुकता, पिन न टाकताच कसं पेमेंट करतं याबाबत सर्वकाही समजून घ्याImage Credit source: Paytm
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 8:22 PM

मुंबई : डिजिटल युगात युपीआयच्या माध्यमातून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. त्यामुळे सर्व्हरवर ताण येऊन सिस्टम डाउन होणं सामान्य झालं आहे.ग्राहकांची अडचण समजून गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात एनपीसीआयनं युपीआय लाइट सादर केलं आहे.कमी रक्कम पाठवण्यासाठी युपीआय लाइट हे सर्वात बेस्ट वर्जन आहे. आता पेटीएमनं हे तंत्रज्ञान आपल्या प्लॅटफॉर्मवर सुरु केलं आहे.भारतात पेटीएम हे पेमेंट अ‍ॅप बहुतांश युजर्स वापरतात. या माध्यमातून पेमेंट करणाऱ्यांची संख्याही सर्वाधिक आहे.त्यामुळे या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे. पेटीएम युजर्संना या सुविधेमुळे पीक ट्रान्सक्शनदरम्यान कोणतीही अडचण भेडसावणार नाही. या माध्यमातून युपीआय लाइट युजर्स एका वेळी 200 रुपयांपर्यंत “Quick and seamless transactions” करू शकतात.पेटीएम वॉलेटमध्ये पेमेंटसाठी कोणताही पिन मागितला जाणार नाही. युजर्स कोणत्याही चार्जशिवाय युपीआय बॅलेंस एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करू शकतात.पेटीएम युपीआय लाईटला सपोर्ट करणारं पहिलं थर्ड पार्टी युपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. कंपनीचा दावा आहे की, या अ‍ॅपच्या माध्यमातून रियल टाइम ट्रान्सक्शन करु शकता.

युपीआय लाईट कसं सेट कराल

  • सर्वात आधी पेटीएम अ‍ॅप ओपन करा
  • त्यानंतर होम पेजवर ‘युपीआय लाइट सेटअप करा’, असं ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक कराल.
  • आता बँक अकाउंट सिलेक्ट कारा आणि युपीआय लाईटशी कनेक्ट करा.
  • युपीआय लाईट सेटअप करण्यासाठी प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता युपीआय लाईटमध्ये पैसे अ‍ॅड करा. यामध्ये तुम्ही 1 रुपया ते 2000 रुपयांपर्यंत अमाउंट जमा करु शकता.
  • एकदा ही रक्कम सेट केली की, पेमेंट करण्यासाठी युपीआय लाईटचा वापर सुरु करु शकता.

युपीआय लाईट वापरताना असं पेमेंट कराल

  • क्यूआर कोड स्कॅन करा किंवा कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्यक्ती सिलेक्ट ज्याला तुम्हाला पेमेंट करायचं आहे.
  • यानंतर किती पैसे ट्रान्सफर करायचे आहे ते क्लिक करा
  • पे सिक्युअरली या ऑप्शनवर क्लिक करा.
  • तुमच्याकडून सेट केलेली अमाउंट लगेचच ट्रान्सफर होईल. यासाठी कोणताही युपीआय पिन टाकण्याची गरज नाही.

साइनअप केल्यानंतर 100 रुपयांचं कॅशबॅक

सध्या तरी 9 बँका पेटीएम युपीआय लाईटला सपोर्ट करतात. यात कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉलल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. जे युजर्स पहिल्यांदा साइनअप करतील आणि 1000 रुपये अ‍ॅड करतील त्यांना 100 रुपयांचं कॅशबॅक मिळेल.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.