आता नेटवर्कशिवाय कॉल, मेसेज करता येणार, Iphone 13 मध्ये मिळणार नवं तंत्रज्ञान

या वर्षीच्या आयफोनमध्ये कंपनी 5G तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे टाकणार आहे. आयफोन 13 मध्ये नवीन सेल्युलर रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आता नेटवर्कशिवाय कॉल, मेसेज करता येणार, Iphone 13 मध्ये मिळणार नवं तंत्रज्ञान
Iphone 13
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 5:51 PM

मुंबई : Apple कंपनीने आपल्या आयफोन लाइनअपमधील आयफोन 12 मध्ये 5 जी कनेक्टिव्हिटी ऑफर केली. याला लोकांचा भरपूर पाठिंबा मिळाला. अशा स्थितीत या वर्षीच्या आयफोनमध्ये कंपनी 5G तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे टाकणार आहे. आयफोन 13 मध्ये नवीन सेल्युलर रेडिओ तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विश्लेषक मिंग ची कू के यांच्या मते, आयफोन 13 लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच LEO सॅटेलाइट कम्युनिकेशन फीचरसह येऊ शकतो, जे फोन नेटवर्क नसतानाही आपल्याला कॉल करण्यास आणि एसएमएस पाठविण्यात मदत करेल. (You will be able to call and send sms without network in iphone 13, using Low Earth Orbit)

कु म्हणाले की, LEO तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आयफोनमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे सेल्युलर कनेक्टिव्हिटी अपग्रेड असणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमचे डिव्हाइस सॅटेलाइट आधारित कम्युनिकेशन क्रिएट करेल. तुमचे डिव्हाइस 4G किंवा 5G नेटवर्क रेंजच्या बाहेर असतानाही हे शक्य होईल. 2019 मध्ये ब्लूमबर्गने पहिल्यांदा अहवाल दिला होता की, Apple लवकरच आयफोनमध्ये LEO उपग्रह सॅटेलाइट कम्युनिकेशन मोड वापरणार आहे.

iPhone 13 घ्यायचाय? खिसा हलका करण्याची तयारी ठेवा

आयफोनच्या किंमतीवरुन मिमर्स आधीच किडनी विकण्याचे मिम्स बनवत असतात. गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 12 प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 19 हजार रुपये इतकी आहे. आता आयफोन 13 लाँच होण्याच्या मार्गावर आहे. हा फोन आयफोन 12 पेक्षाही महाग असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर किडनीवरुन तयार केलेले मिम्स पाहायला मिळू लागले आहेत.

Apple कंपनी पुढील महिन्यात आयफोन 13 लाँच करण्याची योजना आखत आहे. चिप उत्पादन खर्चातील वाढ भरून काढण्यासाठी टेक जायंट Apple आगामी आयफोनची किंमत वाढवेल. डिजिटाइम्सच्या मते, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग रिंग कंपनी (टीएसएमसी) त्यांच्या चिप उत्पादनाची किंमत वाढवण्याची योजना आखत आहे, ज्याचा परिणाम Apple सह अनेक कंपन्यांच्या ग्राहकांवर होईल.

टीएसएमसी त्यांच्या लेटेस्ट आणि मेच्योर प्रक्रिया तंत्रज्ञानासाठी त्याची किंमत 20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. या वाढीचा परिणाम TSMC च्या ग्राहकांवर होईल, ज्यात Apple iPhone उत्पादक आहेत, ज्यांनी त्यांची iPhone 13 सिरीज अधिक किंमतीवर विकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून कंपनीच्या नफ्यावरील परिणाम कमी होईल. अहवालानुसार, या बदलांमुळे, आयफोन 13 च्या किंमतीत 3-5 टक्के वाढ होईल कारण लेटेस्ट सब -7 एनएम प्रोसेस टेक्नॉलॉजी कोट्स 3-10 टक्के वाढू शकतात.

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री?

Apple ने आयफोन 13 सिरिजच्या लाँचिंगची तारीख निश्चित केली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु वापरकर्त्यांना अद्याप याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण आता एका चीनी सोशल मीडिया वेबसाईट नुसार, Apple 17 सप्टेंबरला आपला पुढील आयफोन लाइनअप लाँच करू शकते. साधारणपणे Apple कंपनी मंगळवारी लॉन्च इव्हेंट आयोजित करते आणि शुक्रवारपासून त्या उत्पादनाची विक्री सुरू होते.

तसेच, पोस्टमधून हे देखील उघड झाले आहे की, कंपनी गुरुवारी, 30 सप्टेंबर रोजी थर्ड जनरेशन एअरपॉड लॉन्च करणार आहे. Weibo पोस्टवर तारीख जाहीर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये ई-कॉमर्स अॅपचे चित्र दिसत आहे, ज्यात आगामी Apple उत्पादनांची माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या स्क्रीनशॉटनुसार, अॅपल 17 सप्टेंबरपासून आयफोन 13 चे चारही मॉडेल विकण्यास सुरुवात करेल. यामध्ये आयफोन 13, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचा समावेश असेल. आयफोन लाँच केल्यानंतर, एअरपॉड्स 3 सप्टेंबरमध्ये सादर केले जातील.

इतर बातम्या

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

(You will be able to call and send sms without network in iphone 13, using Low Earth Orbit)

आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.