हेरगिरी पडली Google बाबाला महागात! डेटा चोरल्याप्रकरणी मोजणार 41 हजार कोटी

Google Lawsuit | हेरगिरी प्रकरणात गुगलला दणका बसला आहे. काही दिवसांपूर्वी गुगलवर युझर्सचा डाटा चोरल्याचा, त्यांची वैयक्तिक माहिती चोरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणात आता गुगलने एक पाऊल मागे घेतले आहे. आरोपांची राळ उडाल्यानंतर कायदेशीर प्रक्रियेत न अडकता, भरपाई करण्याची भूमिका कंपनीने घेतली आहे. काय आहे प्रकरण?

हेरगिरी पडली Google बाबाला महागात! डेटा चोरल्याप्रकरणी मोजणार 41 हजार कोटी
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 2:19 PM

नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : सर्वांचा लाडका गुगल बाबा लपून छपून युझर्सची माहिती चोरत होता. ही हेरगिरी गुगलला महागात पडली. वापरकर्त्यांची खासगी माहिती चोरल्याप्रकरणात गुगलला दणका बसला. याप्रकरणात कायदेशीर गुंत्यात न अडकण्यासाठी कंपनीने भरपाईची भूमिका घेतली आहे. गुगलची मूळ मालक अल्फाबेट त्यासाठी 5 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 41 हजार कोटी रुपये भरपाई मोजणार आहे. हेरगिरी केल्याप्रकरणात गुगलविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. गुगलने हा खटला निपटारा केल्याचा दावा केला आहे.कॅलिफोर्नियातील न्यायालयाने कंपनीला त्यासाठी 24 फेब्रुवारी 2024 पर्यंतचा कालावधी दिला आहे. जर गुगलने विहित कालावधीत भरपाई केली नाही तर दंड ठोठावण्यात येईल.

तीन वर्षांपूर्वीचा खटला

हा खटला 2020 मध्ये दाखल करण्यात आला होता. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, Google एनालिटिक्स, कुकीज आणि एप्सच्या माध्यमातून ग्राहकांची हेरगिरी करते. त्यांचा डाटा चोरते. गुगल युझर्सची आवड-निवड, त्याचे मित्र, त्याचा छंद, आवडते हॉटेल, जेवण, खरेदीची सवय आणि इतर खासगी गोष्टींची माहिती चोरते. गुगलने हा खटला निरस्त म्हणजे फेटाळण्याची विनंती कोर्टाला केली होती. पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळली. या खटल्यात 1 जून 2016 रोजीपासून अनेक गुगल वापरकर्त्यांना प्रतिवादी करण्यास मंजूरी मिळाली. प्रत्येक युझरने कमीत कमी 5 हजार डॉलर भरपाई देण्याची विनंती केली आहे.

हे सुद्धा वाचा

पुश नोटिफिकेशनमधून हेरगिरी

गुगलवर अनेक युझर्संनी यापूर्वी सुद्धा हेरगिरी करण्याचा आरोप लावला. अमेरिकन सीनेटर रॉन विडेन (Ron Wyden) यांनी याचे खापर सरकारवर फोडले. त्यांनी सरकारचा गुगलला पाठिंबा असल्याचा आरोप केला होता. त्यांनी न्याय विभागाला एक पत्र लिहिले. त्यात गुगल पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचा आरोप लावण्यात आला होता. पुश नोटिफिकेशन हा एक पॉप अप मॅसेज आहे. होम स्क्रीनवर नवीन मॅसेज आल्यावर तो युझर्सला अलर्ट देतो. यामाध्यमातून वापरकर्त्याची हेरगिरी करता येते. पुश नोटिफिकेशन ऑन केल्यावर टेक कंपन्यांना मोबाईलमध्ये कोणते एप इन्स्टॉल आहे, याचा पत्ता लागतो. तुमचा आयडी, पासवर्ड, मित्र, तुमची मित्र यादी, गुगलवर तुम्ही एकांतात करत असलेला सर्च याची सर्व माहिती मिळते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.